Mahavitran, ACB Sarkarnama
पुणे

Pune Bribe News : लाचखोर महावितरणच्या अधिकाऱ्याला शॉक! चक्क खोट्या नोटा स्वीकारताना पकडले

Pune Crime News : कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक सोहेल शेखला चार हजाराची लाच घेताना पकडले

उत्तम कुटे

Pune News : पुणे जिल्ह्यात एसीबीचा कारवाईचा वेग पुन्हा काहीसा मंदावला आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात दुसरा ट्रॅप केला. त्यात महावितरणचा कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक सोहिल सुलेमान शेख याला साडेचार हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्यात दीड हजाराच्या नोटा या खेळण्यातील म्हणजे खोट्याच होत्या. यामुळे अधिकाऱ्यांना लाचेचा मोहच काही केल्या आवरताना दिसत नसल्याची चर्चा मात्र रंगली आहे.

एसीबी पुणे रेंजचा ट्रॅपच्या कारवाईतील राज्यातील पहिला नंबर यावर्षी नाशिकने हिरावून घेतला. त्यांच्या यूनिटच्या एसपी शर्मिला घारगे-वालावलकर या बडी धेंडे (क्लास वन अधिकारी) लाच घेताना पकडत आहेत. दुसरीकडे, एसीबीचे पुणे युनीटच्या गळाला मात्र क्लास टू आणि थ्री मधील लाचखोर लागत आहेत. मंगळवारी पकडलेला शेख हा क्लास थ्री कर्मचारी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यापूर्वीही याच श्रेणीतील सोनोरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील तलाठी निलेश सुभाष गद्रे याला ७ नोव्हेंबरला एका तरुण शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडले होते. दुसरा योगायोग म्हणजे ज्या दिवशी तक्रार आली, त्याच दिवशी तिची पडताळणी करीत एसीबीने या दोन्ही कारवाया वेगाने केल्या, हे विशेष.

तक्रारदाराच्या बक्षीसपात्र जमीनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी आदित्य मधुकर कुंभारकर (वय २१, रा. वजपुरी, ता.पुरंदर) या आपल्या पंटरमार्फत गद्रेने लाच घेतली होती. त्यानंतर मंगळवारी महावितरणच्या हडपसर उपविभाग कार्यालयातील शेख याला एसीबीने आपला इंगा दाखवला.

काय आहे प्रकरण ?

या प्रकरणातील तक्रारदाराने खरेदी केलेल्या एका फ्लॅटचे वीज कनेक्शन काय़मचे तोडण्यात आले होते. ते पुन्हा जोडून त्याचे बिल ऑनलाईन करण्यासाठी त्याने साडेसहा हजार रुपये लाच मागितली. नंतर साडेचार हजारावर तडजोड़ केली. ती घेताना त्याला मोहमदवाडी, हडपसर येथील श्रीराम चौकात पकडण्यात आले. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पीआय प्रवीण निंबाळकर करीत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT