Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : बंडखोरांनंतर आता फडणवीसांचा नंबर; नागपुरात धडाडणार पवारांची तोफ

Yuva Sangharsh Yatra End In Nagpur : युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा नागपुरात
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : राज्यभरात चिघळलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका युवा संघर्ष यात्रेला बसला होता. ही यात्रा दोन आठवडे स्थगित केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष यात्रेची सांगता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात होणार आहे. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. या सभेत पवार काय बोलणार, याचीच सध्या चर्चा सुरू आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील युवावर्गाच्या प्रश्नांबाबत रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढली होती. पुणे ते नागपूर सुरू झालेली यात्रा मराठा आंदोलन चिघळल्यानंतर चौथ्या दिवशीच स्थगित करावी लागली. आता मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केले आहे. यानंतर पवारांनी पुन्हा चौंडी येथून संघर्ष यात्रेस सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मराठा आंदोलकांचा विरोध मावळला; कार्तिकी पूजेचा फडणवीसांचा मार्ग मोकळा

नागपूर येथे पुढील महिन्यात युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेच्या समारोपाला शरद पवारांची सभा होणार आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी फुटल्यानंतर मराठा आंदोलनावरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात पवार काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

दरम्यान, पवारांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांना घेरण्यास सुरुवात केलेली आहे. मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे त्यांच्या मतदारसंघात जाऊन पवारांनी समाचार घेतला होता. यानंतर आता पवारांची तोफ फडणवीसांच्या नागपुरात धडाडणार आहे. या सभेत पवार उरलासुरला हिशोब चुकता करण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Rahul Gandhi On Modi : " मोदी म्हणजे पनौती, भारतीय टीम चांगलं खेळत होती पण..."; राहुल गांधींनी डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com