Pankaja Munde Sarkarnama
पुणे

Pune Election: महायुती पुणे जिल्ह्यातील इतक्या जागा जिंकणार; पंकजा मुंडेंनी आकडाच सांगितला

Pankaja Munde Pune seats Prediction: महाविकास आघाडी व महायुतीपुढील डोकेदुखी वाढली आहे. त्यातच सोमवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुणे दौऱ्यावर असताना मोठे विधान केले आहे.

Sachin Waghmare

Pune News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता राज्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आघाडी व युतींमधील तिन्ही पक्षांनी निश्वास सोडला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी मात्र बंडखोरी कायम असल्याने महाविकास आघाडी व महायुतीपुढील डोकेदुखी वाढली आहे. त्यातच सोमवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुणे दौऱ्यावर असताना मोठे विधान केले आहे.

गेल्या काही दिवसांत नेतेमंडळींना बंडखोरांचे समाधान करताना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पुणे जिल्ह्यातील काही मतदारसंघातही बंडखोरी रोखण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. त्यात, मावळ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघातील उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, येत्या निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा मोठे यश मिळणार असल्याचा दावा करीत पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ असून या 21 जागांवर महायुतीला विजय मिळेल, असा विश्वास भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला.

सोमवारी आमदार पंकजा मुंडे पुणे दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतान मुंडेंनी पुण्यात महायुतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील 21 मतादारसंघांपैकी 18 जागा महायुतीकडे आहेत. मात्र, यावेळी 21 पैकी 21 जागा महायुतीकडे ठेवायच्या आहेत, लोकसभा निवडणुकीत आम्हाला थोडंसं यश कमी मिळाले. मात्र, विधानसभेला 21 जागांवर यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीत भाजपला (Bjp) यश मिळालं आहे, आता महाराष्ट्रातही भाजप महायुतीला मोठं यश मिळेल. त्यानुसार, पुण्यातील 8 पैकी 8 जागा आम्ही जिंकणार, असेही पंकजा यांनी म्हटले. एखादा निर्णय होत नाही, तोपर्यंत मागणी करू शकतात, तो भाजप कार्यकर्त्यांचा डीएनए असल्याचे त्यांनी सांगितले.

21 मतदारसंघात एकूण 304 उमेदवार रिंगणात

482 उमेदवारांनी आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरला होता, त्यापैकी 178 उमेदवारांनी आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 304 उमेदवार रिंगणात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT