Mahesh Landge , Ashatai Buchake sarkarnama
पुणे

Shirur Loksabha constituency : शिरूरमध्ये महायुतीत नाराजी? समन्वय बैठकीला भाजप नेत्यांची दांडी

Roshan More

Mahayuti News : शिरूर लोकसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक आज (सोमवार) चाकण येथे होत आहे. भाजपचे नेते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडत आहे. मात्र, या बैठकीला भाजप नेते, आमदार महेश लांडगे, राम गावडे, आशा बुचके अनुपस्थित असल्याने महायुतीतील इतर घटक पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महायुतीत शिरूरची जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) लढत आहे. शिवसेनेत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांना येथून अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. शिरूरच्या जागेवर महायुतीकडून नियोजन सुरू आहे. त्यासाठी चाकणच्या एका हाॅटेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. मंत्री उदय सामंत, आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, अतुल बेनके, विलास लांडे या बैठकीला उपस्थितीत आहेत.

मात्र, बैठकीला मतदारसंघातीलच आमदार महेश लांडगे, भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल देशमुख, राम गावडे आणि आशा बुचके अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले आहे. बैठकीमध्ये प्रचार आणि सभांचे नियोजन करण्यात येत आहे. या आधी बारामती मतदारसंघात झालेल्या महायुतीच्या बैठकीला हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे उपस्थित नव्हते, त्यामुळे तेव्हा ते नेते नाराज असल्याची चर्चा होती.

दरम्यान, शिरूरच्या जागेवर जिंकण्याचा विश्वास या आधीच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे, तर अमोल कोल्हे यांनीदेखील प्रचाराला सुरुवात केली असून, आढळराव पाटील यांना पुन्हा धुळ चारणार असल्याचे बोलून दाखवले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT