Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे लोकसभेचा एक उमेदवार बदलणार; तो उमेदवार मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्रातील?

Shivsena- BJP Yuti : भारतीय जनता पक्षाच्या तीव्र विरोधानंतर ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ही उमेदवारी असू शकते, त्यामुळे कोणत्या मतदारसंघातील उमेदवारी मागे घेतली जाणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Mumbai, 1 April : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या आठ लोकसभा उमेदवारांपैकी एक अथवा दोन ठिकाणची उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते. भारतीय जनता पक्षाच्या तीव्र विरोधानंतर ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ही उमेदवारी असू शकते, त्यामुळे कोणत्या मतदारसंघातील उमेदवारी मागे घेतली जाणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. तिकीट बदलतो, मात्र नवीन उमेदवार भाजपने निवडून आणावा, अशी अट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातल्याचे समजते.

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेकडून चार दिवसांपूर्वी आठ उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यात रामटेक- राजू पारवे, बुलडाणा- प्रतापराव जाधव, मावळ- श्रीरंग बारणे, शिर्डी- सदाशिव लोखंडे, हिंगोली- हेमंत पाटील, दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, कोल्हापूर- संजय मंडलिक, हातकणंगले- धैर्यशील माने यांचा समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Nashik Lok Sabha Constituency : नाशकात महायुतीचं ठरलं; छगन भुजबळ भिडणार ठाकरे गटाच्या वाजेंना!

भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत पहिल्यापासून आक्षेप होता. काही मतदारसंघांतील उमेदवार बदलण्याची मागणी भाजपकडून होत होती. तसेच, काही मतदारसंघही भाजपने शिवसेनेकडे (Shivsena) मागितले होते. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले, तर मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघाचा प्रामुख्याने समावेश होता. त्यामुळे यातील कोणते मतदारसंघ आहेत का? की अन्य मतदारसंघांचा त्यात समावेश आहे, याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.

खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या उमेदवारीला भाजपकडून पहिल्या दिवसांपासून विरोध होता. हिंगोलीतील स्थानिक भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून रविवारी झालेल्या बैठकीत विरोध दर्शविण्यात आला. हेमंत पाटील यांचा प्रचार आम्ही करणार नाही, असा इशारा या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी दिला, त्यामुळे हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलणार की अन्य कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात यावा; अन्यथा दोन्ही जागा भाजपला सोडण्यात याव्यात, असा आग्रह भाजपचा होता. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक, तर हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांना बदलण्याचा हट्ट भाजपकडून धरण्यात आला होता. मात्र, शिवसेनेने कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार कायम ठेवून त्यांनाच तिकीट दिले आहे. त्यामुळे आता नेमके कोणाचे तिकीट कापले जाणार याची उत्सुकता आहे.

Eknath Shinde
Madha Lok Sabha Constituency : माढ्यात नवा ट्विस्ट; पवारांकडून प्रवीण गायकवाडांना तयारी करण्याची सूचना

एखादा-दुसरा उमेदवार बदलला जाऊ शकतो : संजय शिरसाट

उमेदवार बदलण्याची कल्पना मला नाही. पण एखादा उमेदवार कमकुवत वाटत असेल तर तो उमेदवार बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे एखादा-दुसरा उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो उमेदवार पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील असू शकतो. कारण या दोनच विभागातील उमेदवार जाहीर झाले आहेत, असे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

R

Eknath Shinde
Lok Sabha Election 2024: उमेदवारीनंतरही बारणेंविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांचा रोष; काम न करण्याचा इशारा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com