Mahesh Landge Sarkarnama
पुणे

Mahesh Landge : महेश लांडगेंनी लावलेल्या ताकतीला आलं बळ! आळंदीच्या बालेकिल्ल्यात विरोधक चितपट; 21 पैकी 15 जागांवर वर्चस्व

Mahesh Landge political strength in Alandi : महेश लांडगेंनी उभारलेल्या ताकतीला मोठे यश. आळंदीच्या बालेकिल्ल्यात विरोधक चितपट होत 21 पैकी 15 जागांवर वर्चस्व मिळवले.

Sudesh Mitkar

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार केल्यास पुणे जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वर्चस्व कायम ठेवला असल्याचं पाहायला मिळाला आहे. बहुतांश ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. असं असलं तरी भाजपने देखील पुणे जिल्ह्यात चांगलीच मुसंडी मारली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आळंदी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मोठे यश संपादन केला आहे. नगराध्यक्ष हा भाजपाचा झाला असून 21 पैकी तब्बल 15 जागा या भाजपने जिंकले आहेत. या निवडणुकीची जबाबदारी भाजप आमदार महेश लांडगे यांनी स्वतःवर घेतली होती त्यासाठी त्यांनी आपली सर्व ताकद देखील पणाला लावली होती त्यानंतर हा विजय झाला आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना असा थेट सामना रंगाचं पाहायला मिळालं होतं.


राज्यातील 288 नगरपरिषदांपैकी 214 हून अधिक नगराध्यक्ष पदांवर भाजपाच्या महायुतीने विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील मोठं यश संपादन केल्याचं पाहायला मिळत आहे. तर अजित पवार यांची देखील राज्यातील ताकद वाढल्याचे पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यात देखील अजित पवार यांनी चांगलं यश मिळवला आहे.

विशेषतः श्री क्षेत्र आळंदी नगरपरिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत 21 पैकी 15 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच नगराध्यक्षपदी प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

याबाबत बोलताना महेश लांडगे म्हणाले, ‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ या भूमिकेला मतदारांनी दिलेला स्पष्ट कौल भाजपाच्या धोरणांवरील विश्वास दर्शवतो, असे आमदार लांडगे म्हणाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीत मिळालेला हा विजय भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदीतील या महाविजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतही होईल, असा ठाम विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT