Ajit Pawar shock to BJP : पुण्यात 'ऑपरेशन लोटस'चा फुगा फुटला : अजितदादांनी 'पॉवर' दाखवली; 21 जागांच्या लढतीत भाजपची पिछेहाट

Ajit Pawar biggest political shock to BJP : ऑपरेशन लोटसअंतर्गत भाजपला मोठा धक्का बसला असून २१ पैकी अवघ्या दोन जागाच भाजपच्या वाट्याला आल्या. अजित पवारांच्या राजकीय खेळीचा आढावा.
Pune Panchayat election 2025
Pune Panchayat election 2025sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळापासून भाजप 'ऑपरेशन लोटस'च्या माध्यमातून आपली ताकद वाढवताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना भाजपने गेल्या वर्षभरामध्ये पक्ष प्रवेश दिला असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपच्या या प्रयत्नांना सासवड नगरपालिकेसहभोर मध्ये काही प्रमाणात यश येताना पाहायला मिळत असलं तरी जेजुरीमध्ये भाजपचे मनसुबे धुळीत मिळवले असल्याचं पाहायला मिळत आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे.

जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दहा प्रभागांतून 20 उमेदवार व 1 नगराध्यक्ष निवडला जाणार होते 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 15,800 मतदारांपैकी 12,333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 78 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या एकूण 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशिबात होते.

Pune Panchayat election 2025
Meghna Bordikar : जिंतूरमध्ये भाजपचा 'प्रताप'; हायव्होल्टेज लढतीत मंत्री मेघना बोर्डिकरांकडून राष्ट्रवादीचा पराभव

ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट झाली. दोन्ही पक्षांचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह प्रत्येकी 21 उमेदवार रिंगणात होते. याखालोखाल शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदासह तीन, तर उबाठा गटाचे दोन आणि काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक असे उमेदवार रिंगणात होते.

Pune Panchayat election 2025
Sawantwadi Nagar Parishad : निलेश राणे यांना मोठा धक्का: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले विजयी, शिवसेनेचे 7 जागेवर समाधान

मात्र राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. 3000 मतांनी मोठा विजय त्यांनी साकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. सर्वभाजपाला अवघ्या जागांवरती समाधान मानावं लागलं आहे तर एका जागेवर तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com