Mahesha Landage :  Sarkarnama
पुणे

Mahesh Landage : भोसरीच्या पैलवान आमदारांनाच मागितली ३० लाखांची खंडणी !

Pimpri Chinchwad News : 30 लाख नाही दिले तर जीवे मारण्याची धमकी..

सरकारनामा ब्यूरो

Mahesha Landage : उद्योग नगरी अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्याकडे अज्ञाताने ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर हा मेसेज करण्यात आला होता. (Sarkarnama Marathi News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी याविषयी 'सरकारनामा'शी संवाद साधला. पोलीस निरीक्षक जाधव यांच्या माहितीनुसार, भोसरीचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्याकडून मतदारसंघातील नागरिकांच्या साहाय्यासाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली आहे.

दरम्यान, यापरिवर्तन हेल्पलाईनवर मंगळवारी (दि. ४) सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने यावर एक मॅसेज पाठवला होता. यामध्ये तब्बल ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी ही करण्यात आली आहे. तसेच, खंडणीनीची पूर्तता न केल्यास, जीवे मारण्याची ही धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी आता भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे, पोलीस निरीक्षक जाधव यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT