Karnataka Assembly Election : मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच; 'असा' निवडणार उमेदवार

Karnataka Congress : काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीवर नामी उतारा
Siddaramaiah, D. K. Shivakumar
Siddaramaiah, D. K. ShivakumarSarkarnama
Published on
Updated on

Congress Candidate for CM : कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील काँग्रेस पक्षातील गटबाजी उफाळून आल्याचे दिसून येत आहे. त्या गटातील वाद दिवसेंदिवस समोर येत आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यातील वाद काही केल्या मिटताना दिसत नाहीत. सिद्धरमय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे लपून राहिलेले नाही. दरम्यान, एका सर्वेक्षणात कर्नाटक राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्याचे शक्यता वर्तविली आहे.

Siddaramaiah, D. K. Shivakumar
Maharashtra Cabinet : सततचा पाऊस यापुढे नैसर्गिक आपत्ती; मंत्रिमंडळ बैठकीत कोणते मोठे निर्णय?

सिद्धरमय्या आणि शिवकुमार (D. K. Shivkumar) यांच्यात काही दशकांपासून वाद सुरू आहे. तो राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडे यात्रेदरम्यान संपल्याचे दिसून आले होते. फेब्रवारी महिन्यात मात्र त्यांनी उत्तर आणि दक्षिण भागात आपापल्या यात्रांचे आयोजन केले होते. त्यावेळी २०१९ मध्ये पक्ष सोडणाऱ्या आनंद सिंह या आमदाराने शिवकुमार यांची भेट घेतली होती. पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवरून त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला. सिद्धरमय्यांनी पक्ष बदलाणाऱ्या पुन्हा स्थान देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

Siddaramaiah, D. K. Shivakumar
Raju Shetty News : एकरकमी 'एफआरपी'वर सुनावणी होईना; राजू शेट्टींच्या नाराजीची दखल कोण घेणार ?

या वादाच्या पार्श्वभूमीवर आता सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी काँग्रेसमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडी कशी होणार, याबाबत वक्तव्य केले आहे. राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री पदासाठी पक्षाचे हायकमांड लक्ष घालणार नाही. काँग्रेसमध्ये लोकशाहीला स्थान आहे. त्यानुसारच मुख्यमंत्री पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले तर निवडून आलेले आमदार मुख्यमंत्री ठरवतील.

Siddaramaiah, D. K. Shivakumar
Eknath Shinde : फडणवीसांनी 'ते' शब्दच उच्चारले नाही; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

काँग्रेस (Congress) पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, "राज्यातील या दोन्ही नेत्यांमधील दरी वाढलेली आहे. त्याचा राज्यातील उमेदवार निवडीवरही परिणाम होत आहे. कारण पक्षाच्या आकड्यांचा मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार, यावर परिणाम होणार आहे. मात्र त्यांनी एकत्र राहून काम केले तर काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, त्यांच्यात बहुतेक मुद्द्यांवर एकमत झाले आहेत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com