AAP candidate Salim Bashir Inamdar addresses media after alleging EVM malfunction in Pune district’s Manchar municipal election and announcing plans to move court over voting irregularities. Sarkarnama
पुणे

Manchar NagarPalika : घरात हक्काची 5 मतं; पडलं एक : EVM अन् व्होटचोरीचा फैसला आता कोर्टातच होणार!

AAP Candidate EVM Controversy : मंचर नगरपालिकेतील आप उमेदवाराला अवघा एक मत मिळाल्याने ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला असून, मत चोरीचा आरोप करत न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने वोट चोरीचा मुद्दा देशभर उचलून धरला आहे. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून देशभरामध्ये सत्ताधारी पक्ष वोट चोरी करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमी वर पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायत निवडणूक लढलेल्या आम आदमी पार्टीच्या एका उमेदवारांनी वेगळाच दावा केला असल्याचं पाहायला मिळत आहे

नुकताच राज्यभरामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले. भाजप हा राज्यातील नंबर वन पक्ष ठरला तर त्याच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणि तिसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. एकूणच महायुतीतील मित्र पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये जोरदार कामगिरी केली आहे.

तर महाविकास आघाडीचा (MVA) सर्वत्र दारुण पराभव झाला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा समोर आला आहे. कारण मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार असलेले सलीम बशीर इनामदार यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत फक्त एक मत पडला आहे. मात्र माझ्या घरामध्ये हक्काची पाच मत असताना मला एकच मत कसं पडलं असा विचार त्यांना पडला असून त्यानंतर त्यांनी ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोप केला आहे. तसेच या विरोधात आपण कोर्टामध्ये याचिका देखील दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

याबाबत सलीम इनामदार म्हणाले, मी मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 6 मधून उभा राहिलो होतो. मला लोकांनी उमेदवार म्हणून स्वतःहून उभं केलं होतं. त्यामुळे मला किमान 100 ते 100 मतदान पडणं अपेक्षित होतं. तसंच माझ्या घरामध्ये माझ्या हक्काचे 5 मतं असताना आणि त्या लोकांनी मला मतदान केलं असताना ती मतदेखील मला मिळालेली दिसत नाहीत.

त्यामुळे मला ईव्हीएम मशीनवर संशय असून मी या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये (Mumbai-High Court) याचिका दाखल करणार असल्याचे इनामदार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता इनामदार यांना त्यांच्या घरातल्यांनीच मतदान केलं नाही की खरंच ईव्हीएम मध्ये काही गडबड होते याबाबतचा निकाल आता कोर्टातच लागणार असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT