Devendra fadnavis, ravindra chavan  Sarkarnama
पुणे

Pune MLC Election 2026 : भैय्या मानेंनंतर मंगेश चिवटेंची माघार; भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मध्यस्थी यशस्वी

Pune MLC Election News : शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुण्यात ठाण मांडून बसले होते. त्यांची शिष्टाई यशस्वी झाली.

Sachin Waghmare

Pune News :राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यामध्ये पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुण्यात ठाण मांडून बसले होते. त्यांची शिष्टाई यशस्वी झाली असून पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली तर पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांना उमेदवारी दाखल केली होती. चिवटे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बंडखोर उमेदवार भैया माने यांनी शुक्रवारी दुपारी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. याच मतदारसंघातून भाजपकडून शरद लाड यांनी देखील डमी अर्ज भरला होता. मात्र स्मिता जाधव यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता पुणे पदवीधर मतदारसंघात आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेनेकडून (Shivsena) मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होती. त्यामुळे चिवटे उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही याबाबत उत्सुकता लागली होती. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता पुणे शिक्षक मतदारसंघात आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार आहे.

दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, उमेदवारी मागे घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला आहे. दुसरीकडे या मतदारसंघात आता महायुतीचे कौस्तुभ गावडे विरुद्ध महाविकास आघाडीचे आमदार जयंत आसगावकर यांच्यात सरळ लढत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT