Manoj Jarange and Laxman Hake sarkarnama
पुणे

Laxman Hake letter : 'जरांगे हे फक्त मुखवटा; मागे क्रूर मराठा राजकीय नेते...', सीएम फडणवीसांना लक्ष्मण हाकेंचे पत्र

Political News : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाबाबतच्या राज्य सरकारच्या शासन निर्णयावर तीव्र नाराजी उपस्थित केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाढत असलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाबाबतच्या राज्य सरकारच्या शासन निर्णयावर तीव्र नाराजी उपस्थित केली आहे. या पत्रात हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील जोरदार टीका केला असून, हा जीआर ओबीसी आरक्षणाचा 'गळा घोटणारा' असल्याचा दावा केला आहे.

हाके यांनी पत्रात म्हटले आहे की, 'गेल्या सात वर्षांत पंचायतराज निवडणुका न झाल्याने ओबीसी समाजात अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने 2022 पूर्वीचे आरक्षण ग्राह्य धरून निवडणुका घेण्याचा निर्णय दिला असता, तर ओबीसींना जिल्हा परिषद सदस्यांपासून महापौरांपर्यंतच्या पदांवर गुलाबी स्वप्ने पडू लागली असती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई गाठून 'हैदराबाद गॅझेट'च्या आधारावर जीआर मंजूर करून घेतला, ज्यामुळे ओबीसींच्या स्वप्नांचा अंत झाला,' असा आरोप हाके यांनी केला आहे.

बोगस दाखल्यांमुळे ओबीसी आरक्षणावर अनधिकृत ताबा

हाके (Laxman Hake) यांनी पत्रात म्हटले आहे की, मराठा समाजातील संरजामी घटक बोगस दाखले तयार करून आधीच ओबीसी आरक्षणावर अनधिकृत ताबा मारत होते. हा जीआर मंजूर झाल्याने त्यांना '12 हत्तींचे बळ' मिळाले आहे. हैदराबाद गॅझेट'मुळे कुळातील, गावातील आणि नातेसंबंधातील लोकांना एका एफिडेव्हिटद्वारे 'कुणबीकरण' करून ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा जीआर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणारा आहे. नारायण राणे समिती आणि गायकवाड आयोग यांना जे जमले नाही, ते फडणवीस सरकारने करून दाखवले असल्याची टीका त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे 'गोलमाल योद्धा' असून ते फक्त मुखवटा आहेत. त्यांच्या आडून क्रूर मराठा राजकीय नेते, आमदार, खासदार आणि कारखानदार आपला हेतू साध्य करत आहेत, असा आरोप हाके यांनी केला आहे. प्रस्थापित मराठा समाजाला सरपंचपासून मुख्यमंत्रीपर्यंत सर्व पदे हवी आहेत, पण गरजवंत मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीशी जरांगे यांचा काही संबंध नाही, असे हाके म्हणाले.

ईब्लुएसच्या कटऑफमध्ये ओबीसींपेक्षा 15 ते 20 गुणांनी कमी गुण असल्याने गरजवंत मराठ्यांच्या शेकडो लेकरांच्या भविष्यांचा बळी गेला आहे. ओबीसीबांधव आतड्या तुटेपर्यंत ओरडतोय की, बलूत-अलूत सामाजिक मागासांच्या स्पर्धेत कसे टिकेल? असा भावनिक सवाल त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT