Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Patil : न्यायालयात हजर राहण्यापूर्वी जरांगेकडून पुण्यातील 8 मतदारसंघाची चाचपणी

Manoj Jarange Patil at Pune : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाची केली चाचपणी. तसेच पुणे कोर्टात आज जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी होणार असल्याने ते पुण्यात आले आहेत.

Chaitanya Machale

Pune News : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याचा निर्णय देखील जरांगे पाटील यांनी यापूर्वी जाहीर केला. त्यासाठी विविध शहरांमध्ये त्यांनी आपले दौरे देखील सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये सात दिवस सध्या त्यांचे दौरे सुरू असून मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.

मनोज जरांगे पाटील आज पुणे कोर्टात हजर राहणार आहेत. पुणे कोर्टात आज जरांगे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी होणार असल्याने ते पुण्यात आले आहेत.

कोर्टात हजर राहण्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. पुणे शहरातील विधानसभा मतदार संघांचा आढावा देखील त्यांनी घेतला. समर्थकांबरोबर बैठका घेऊन पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांची चाचपणी त्यांनी केली.

काय आहे प्रकरण ?

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केलं होतं. त्या नाटकाच्या प्रयोगाचे पूर्ण पैसे संबंधित नाट्य निर्मात्याला दिल्या प्रकरणी नाट्य निर्मात्याने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील मनोज जरांगे हे कोर्टात सुनावणीसाठी आले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. या केसची सुनावणी आज शिवाजीनगर कोर्टात होणार आहे. त्यासाठी जरांगे पाटील पुण्यात (Pune) दाखल झाले आहेत. कोर्टात होत असलेल्या या सुनावणीसाठी उपस्थित राहता यावे म्हणून जरांगे पाटील मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचे आंदोलन अद्यापही सुरू असल्याने त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ उतार सुरू असतात.

जरांगे पाटील यांची तब्येत सध्या व्यवस्थित नसल्याने ॲम्बुलन्स मधून ते पुण्यात दाखल झाले आहेत. आज होणाऱ्या कोर्टातील सुनावणी मध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात कोर्ट काय निर्णय घेत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी कधी उपोषण, कधी मोर्चा असे आंदोलन जरांगे पाटील करत आहेत. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी मधून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. तसेच राज्य सरकारने सगे सोयरे याबाबत तातडीने निर्णय घेऊन अधिसूचना काढावी यासाठी ते आग्रही आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT