Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय; विधानसभा इच्छुकांचे 7 ऑगस्टपासून अंतरवालीत अर्ज स्वीकारणार

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाबरोबरच इतर समाजातील इच्छुकांकडून येत्या 7 ऑगस्टपासून अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार रिंगणात दिसण्याची शक्यता वाढली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 02 August : मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली आहे. मात्र, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाबरोबरच इतर समाजातील इच्छुकांकडून येत्या 7 ऑगस्टपासून अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार रिंगणात दिसण्याची शक्यता वाढली आहे.

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा अद्यापही मार्गी लागलेला नाही, त्यामुळे मराठा आरक्षणासाठी उपोषण, आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच त्यांनी विधानसभा इच्छुकांचे अर्ज मागविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. जरांगे पाटील यांनी आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.

मनोज जरांगे पाटील हे येत्या सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुकानिहाय इच्छुकांनी आपली माहिती अंतरवाली सराटी येथे जमा करायची आहे. जरांगे पाटील यांचा दौरा संपल्यानंतर 13 ऑगस्टपासून इच्छुकांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे.

Manoj Jarange Patil
Rahul Gandhi : राहुल गांधी 'चक्रव्यूहा'त? मध्यरात्री 1 वाजून 52 मिनिटांनी 'ईडी'बाबत खळबळजनक दावा

विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागणार आहे. अंतरवाली सराटी येथे 7 ऑगस्टपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी कोअर कमिटी करणार आहे. मनोज जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत, त्यानंतरच उमेदवारी निश्चित केली जाणार आहे.

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या टीमकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रक्रिया येत्या 13 ते 20 ऑगस्टदरम्यान पूर्ण केली जाणार आहे. विधानसभानिहाय उमेदवारांची आदी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.

Manoj Jarange Patil
Vichare Vs Mhaske : राजन विचारेंची उच्च न्यायालयात धाव अन् नरेश मस्केंना नोटीस, अडचणी वाढणार?

तत्पूर्वी राज्य सरकारने सगेसोयरे आणि मराठ्यांना कुणबीमध्ये आरक्षण दिले, तर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करून राज्यभर जल्लोष केला जाणार आहे, असेही जरांगे पाटील यांच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com