Maratha Reservation News Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Patil Pune News : "२४ तारखेपर्यंत शांत राहू, नंतर भूमिका स्पष्ट करणार; जरांगेंचा पुनर्रुच्चार : आज तोफ धडाडणार

Maratha Reservation News : . "आत्महत्येचं पाऊल उचलू नका," असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजातील युवकांना केले आहे.

Mangesh Mahale

Manoj Jarange Patil Pune Sabha : मराठा आरक्षणासाठी युवकाने आत्महत्या केल्यानंतर आज (शुक्रवारी) मनोज जरांगे यांची पुण्यातील खेडमध्ये सभा होत आहे. सभेत जरांगे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष आहे. सभेपूर्वी "२४ तारखेपर्यंत शांत राहू, नंतर भूमिका स्पष्ट करू. ठरलेल्या वेळेत आरक्षण द्या," असा पुनर्रुच्चार जरांगेंनी केला. सभेला जाण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील जंगी सभेनंतर पुण्यात जरांगेंची तोफ धडाडणार आहे. त्यांच्या निशाण्यावर कोण असणार हे लवकरच समजेल. काल सुनील कावळे या जालन्यातील युवकाने मुंबई खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा समाचार घेत जरांगे सरकारवर टीका करतील, अशी शक्यता आहे. "आत्महत्येचं पाऊल उचलू नका," असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजातील युवकांना केले आहे.

अकरा वाजता खेडची सभा झाल्यानंतर तीन वाजता त्यांची बारामतीत सभा होणार आहे. बारामतीत तीन हत्ती चौकात ही सभा होणार आहे. अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानंतर बारामतीत विराट मोर्चा काढत मराठा समाजाने निषेध नोंदवला होता. १४ ऑक्टोबरच्या सभेलाही बारामतीतून अनेकजण गेले होते. या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील बारामतीत येत आहेत.

बारामती तीन हत्ती चौक येथे शुक्रवारी त्यांची सभा होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना जरांगे पाटील यांची बारामतीत सभा होत आहे. या सभेकडे शहर आणि तालुक्याचे लक्ष लागले आहे. पाच वाजता फलटण आणि त्यानंतर रात्री आठ वाजता दहिवडीत भेट देणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT