Mumbai News : मराठा आरक्षणासाठी पुलावर गळफास घेऊन सुनील कावळे या युवकाने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने त्याचा बळी घेतल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. येत्या २४ तारखेला मनोज जरांगे पाटलांच्या सभेत त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचे सुनील कावळे याचं स्वप्न होते, त्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याचे खंत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जालना जिल्ह्यातील चिकनगाव येथील रहिवाशी असलेले सुनील कावळे हे उदरनिर्वाहासाठी संभाजीनगर येथे आला होता. सुनील हा वाहनचालक म्हणून नोकरी करीत होता. राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारल्यानंतर सुनीलने वाहनचालकाची नोकरी सोडून दिली. नोकरी करीत असताना आंदोलनाला वेळ मिळणार नाही म्हणून त्याने नोकरी सोडून रिक्षा घेतली होती. रिक्षा चालवीत तो आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता.
"जरांगेंसाठी काही तरी केले पाहिजे, ते आपल्याला आरक्षण मिळवून देतील," असा त्यांना विश्वास होता. मुंबई येथे जरांगे पाटलांची मराठा आरक्षणासंदर्भात सभा होणार आहे. या सभेत जरांगे यांच्याबरोबर सेल्फी काढणार असल्याचे त्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. मुंबईतील सभेला हा शर्ट परिधान करून त्यांच्यासोबत सेल्फी काढणारच, असे सुनीलने त्याच्या कुटुंबीयांना फोनवरून सांगितले होते.
सुनील कावळे हा एकटाच जालन्याहून मुंबईत आला होता. बांद्रा परिसरात त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वतःच्या शर्टवर आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहिले आहे. कावळे याच्या बॅगमध्ये पोलिसांना मोबाईला फोन आणि एक सुसाइड नोट सापडली आहे. "एकच मिशन-मराठा आरक्षण" असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. "सगळ्यांनी मला माफ करा," असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आत्महत्या केल्याचा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.