Manoj Jarange Morcha Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Morcha : मनोज जरांगे-पाटलांच्या मोर्चामुळे पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 'असा' असेल पर्यायी मार्ग

Maratha Reservation Mumbai Protest: जरांगे-पाटलांच्या मोर्चामुळे 23 आणि 24 जानेवारीला पुण्यातील काही रस्ते बंद राहणार आहेत.

Chaitanya Machale

Pune News : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मोर्चा काढला आहे. बीड, नगर जिल्ह्यातून मुंबईला जाणारा हा मोर्चा पुणेमार्गे जाणार आहे. मंगळवारी (ता. 23 जानेवारी) हा मोर्चा रांजणगाव येथून कोरेगाव पार्कमार्गे खराडी येथे येणार आहे.

खराडीत जरांगे-पाटील यांचा मुक्काम असणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने मराठाबांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी काही रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाचा आरक्षणासाठी निघालेला हा मोर्चा पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून पुढे लोणावळ्यात जाईपर्यंत मोर्चा मार्गावर व परिसरात गरजेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. हा मोर्चा बुधवारी (ता. 24 जानेवारी) पिंपरी-चिंचवडमार्गे लोणावळा येथे जाणार आहे. मंगळवारी दुपारपासूनच वाहतुकीत आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'असा' आहे वाहतुकीत बदल...

मोर्चा पुणे मुक्कामी असल्याने मंगळवारी दुपारपासूनच अहमदनगर येथे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरून, तसेच कोल्हापूर, सातारा येथून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला - न्हावरे- शिरूरमार्गे जातील.

वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून केडगाव चौफुला न्हावरामार्गे शिरूर ते अहमदनगर जातील, तर पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक, पुढे सोलापूर रोडने यवत केडगाव चौफुला - न्हावरे -शिरूरमार्गे जातील.

हा मोर्चा 24 जानेवारीला पिंपरी-चिंचवडमधून पुढे जाणार आहे. त्यामुळे या दिवशी अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा येथून केसनंद, थेऊरमार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील. वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक - केशवनगर - मुंढवा चौक अशी वळविण्यात येणार आहेत.

तर पुणे शहरामधून नगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, वाघोलीमार्गे नगरकडे असे जाता येईल. हा मोर्चा जसा पुढे जाईल, तसतशी वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे वाहतूक उपायुक्त बोराटे यांनी सांगितले.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT