Pune News : मराठा समाज अन् खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण होणार; महापालिकेच्या एक हजार कर्मचाऱ्यांची फौज तयार

Maratha Reservation: पुणे महापालिकेने मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी कंबर कसली.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यभर मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षण करण्यासाठी वेळ कमी असल्याने सर्वेक्षण वेळेत पूर्ण होणार का ? हा प्रश्न सर्वत्र उपस्थित करण्यात येत आहे. अशातच आता पुणे महापालिकेने मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळत आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने राज्यभर मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. यासाठी मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पुणे शहरातील सर्वेक्षणासाठी महापालिकेने उपायुक्त चेतना केरुरे यांची नियुक्ती सहायक नोडल अधिकारी म्हणून केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 1 हजार 70 कर्मचारी काम करीत आहेत.

दोन आठवडे हे कर्मचारी गुंतून राहणार असल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची फौज या कामाला लागल्याने काही प्रमाणात महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Municipal Corporation
Pimpri TDR Scam : चौकशीसाठी सत्ताधाऱ्यासंह विरोधकही एकवटले, पिंपरी आयुक्तांवर संक्रात?

पालिकेवर जबाबदारी

पुणे (Pune) महापालिकेच्या परिसरातील सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम करत आहे. यासाठी राज्यात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या अहवालाचा वापर आरक्षणाच्या पूर्ततेसाठी करण्याचे नियोजन आहे.

एक हजार पाच प्रगणक

या सर्वेक्षणासाठी महापालिकेने उपायुक्त चेतना केरुरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे सर्वेक्षण घरोघरी जाऊन करायचे असल्याने 1 हजार 5 लिपिक दर्जाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक 15 कर्मचार्‍यांमागे एक सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांकडून संकलित करणारे येणारी माहिती राज्य मागास आयोगाला पाठवण्यात येणार आहे.

ऑनलाइन फॉरमॅटमध्ये माहिती भरणार

शहरातील संपूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी 2 हजारांहून अधिक प्रगणक लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक हजार पाच प्रगणकांची ऑर्डर काढली असून अजून एक हजार प्रगणकांची ऑर्डर काढण्यात येणार आहे. सर्वेक्षणाची माहिती घरोघरी जाऊन ऑनलाइन फॉरमॅटमध्ये भरायची आहे.

यासाठी शासनाने अ‍ॅप तयार केले आहे. यातील 40 पानी अर्जावर सर्व प्रश्न घेण्यात आले आहेत. शासनाकडून आदेश आल्यानंतर प्रत्यक्षात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होईल. प्रत्येक प्रगणकाकडे 100 कुटुंबांचे सर्वेक्षणाचे काम देण्यात येणार असून 15 दिवसांत त्यांना हे काम पूर्ण करावे लागणार आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Pune Municipal Corporation
Mahayuti News : महायुतीतील धाकट्या भावांवर 'संक्रात' : 'तिघेच वाटून घ्याल, आम्हाला...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com