Pune News Sarkarnama
पुणे

Pune Maratha Protest News : समाजाला उपयोगी नसेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हा ; मराठा मोर्चाची शिंदे-पवारांना हाक

Pune News : मराठा क्रांती मोर्चाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात निदर्शने करीत सर्वच मराठा लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी केली.

उत्तम कुटे

Maratha Protest News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमूदत उपोषणास बसलेल्यांवर लाठीमार करीत त्यांचे आंदोलन पोलिसांनी शुक्रवारी चिरडून टाकले. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून पोलिसीबळाचा आणि राज्य सरकारचाही निषेध होत आहे. हे लोण आज पुण्यापर्यंत आले. मराठा क्रांती मोर्चाने पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात निदर्शने करीत सर्वच मराठा लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मराठा असूनही त्यांना समाजासाठी त्यांच्या पदाचा उपयोग होत नसेल, तर त्यांनी त्यावरुन पायउतार व्हावे, राजीनामा द्यावा, सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी आंदोलकांच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी केली. जालन्याच्या एसपींना त्वरित निलंबित करावे, अशी दुसरी मागणी त्यांनी केली. कालच्या समाजबांधवांवरील लाठीचार्जचा साधा निषेधही न करणाऱ्या मराठा लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा, असे ते 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले.

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे कालची जालन्याची घटना घडल्याचे कुंजीर यांनी सांगितले. कालच्या लाठीहल्यातून महिला, मुलांनाही सोडण्यात न आल्याने हे आंदोलन चिरडण्याचाच हेतू स्पष्ट होता, असा दावा त्यांनी केला. तरीही जाळपोळ व हिंसाचार न करता गौतम बुद्धांच्या शांततेच्या मार्गाचा अवलंब करा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

कोंढरे यांच्यासह अनिल लांडगे, सचिन आडेकर, धनाजी येळकर, सतीश काळे, जीवन बोराडे, पूजा झोळे, रविंद्र माळवदकर, अमर पवार, वेणू शिंदे, आरती मारणे, प्रशांत धुमाळ, किशोर मोरे आदी आजच्या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. 'एक मराठा, लाख मराठा,' 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा त्यांनी दिल्या.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT