Manoj Jarange called Chalo Mumbai for Maratha reservation - मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मैदानात उतरले आहेत. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी त्यांनी ‘चलो मुंबई’ची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडक देणार आहे. जरांगे यांच्या या घोषणेनंतर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून 27 ऑगस्ट रोजी ‘चलो मुंबई’ आंदोलनाची सुरुवात होणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची औपचारिक घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा आक्रमक झाले आहेत. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी पुण्यात समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
हाके यांनी सांगितले की, ओबीसींच्या हक्कावर गदा येणार नाही यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल. यासाठी ते आजपासून गावोगावी जाऊन समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत. हाके यांनी जाहीर केले की, पुण्यामध्ये 4 जुलै रोजी आढावा बैठक घेऊन पुढील आंदोलनाची रणनीती जाहीर केली जाईल. त्यानंतर 15 जुलैला पुण्यात ओबीसी समाजाची मोठी नियोजन बैठक होणार आहे, ज्यात आगामी आंदोलनाची दिशा ठरेल.
तसेच राज्यभरातील ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथून मुंबईकडे संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून, ही यात्रा म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला उत्तर दिले जाणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.