
Chandrapur District Central Cooperative Bank Election Update - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक नाट्यमय व धक्कादायक गोष्टी घडल्या आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली तर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूरचे भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या भावानेसुद्धा आपला अर्ज मागे घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत.
या घडामोडीमुळे त्यांच्या गटात निवडणूक लढणारे चंद्रपूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रोहित बोम्मावार अचानक प्रकाशझोतात आले आहेत. यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला असून कुठलीतरी अदृष्य राजकीय शक्ती त्यांच्या मागे उभी असल्याचे बोलले जात आहे.
बोम्मावार उद्वव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे समर्थक आहेत. सध्या या निवडणुकीचे सर्व सूत्र भाजपचे आमदार बंटी भांगडिया हलवत असल्याचे दिसून येते. खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध निवडूण येणे हा त्यांच्याच डावपेचाचा भाग होता. त्या बदल्यात भांगडिया यांच्याही समर्थक महिला गटातून निवडून आल्या आहेत. रोहित बोम्मावार ब २ गटात यांनी अर्ज दाखल केला आहे. याच गटातून त्यांच्यासमोर आमदार किशोर जोरगेवार व शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे बंधू सुरेंद्र अडबाले यांचे सर्वात मोठे आव्हान होते. मात्र दोन्ही दिग्गजांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आता वासुदेव खेळकर, उमाकांत धांडे, किशोर ढुमणे, प्रकाश खरवडे, मिलिंद संगमवार, दशरथ कामतवार हे या गटातून रिंगणात आहेत. दोन बड्या नेत्यांनी माघार घेतल्याने बोम्मावार यांच्या सेटिंगची सध्या जिल्हा बँकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. यामुळे आर्थिक व राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यापैकी १२ संचालक अविरोध निवडून आले आहेत. उर्वरित आठपैकी एक उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याने त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणावर न्यायालयाचा निकाल आलेला नाही. त्यामुळे एका जागेची निवडणूक स्थगिती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त सात संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.