Pune News : मारुती नवले यांच्या 'सिंहगड इन्स्टिट्यूट' या शिक्षण संस्थेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा गेल्या 9 दिवसांपासून संप सुरू आहे. तब्बल 20 महिन्यांचा पगार प्रलंबित असल्यामुळे आणि विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारला आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने अनेक कामगारांची दयनी अवस्था झाली आहे. मात्र तरीही कॉलेज व्यवस्थापकांकडून कुठलेही प्रतिक्रिया किंवा आंदोलनाला उत्तर देण्यात आले नाही, असे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, '110 शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलन करत आहेत. संपात सहभागी आहेत. आम्हाला घर चालवणे अवघड झाले आहे. 20 महिने झाले पगार नाही, 2022 पासून पीएफ नाही. काम सोडलं तर पगारातून बाजुला केलं जातं.'
'सगळ्यांच्या परिस्थिती हालकीची झाली आहे. आमच्या संपाचा ९ दिवस आहे. प्रशासन म्हणून आम्हाला कोणी भेटायला आले नाही. काल आम्हाला मारुती नवलेसरांनी बैठकीला बोलावले होते. मात्र, आता बैठकीला घेतले नाही. फक्त टाईमपास केला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही.', असे देखील आंदोलकांनी सांगितले.
तीन जुलैला मारुत नवले यांच्यासह 6 जणांवर सिंहगड एज्युकेशन सोसायटीतील २७ शिक्षकांचे तब्बल पाच कोटी सहा लाख रुपयांचे वेतन थकवून त्याचा अपहार केल्याप्रकरणी विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेपाच वर्षांपासून वेतन न मिळाल्याने शिक्षकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.