Pune Crime News: 'सिंहगड एज्युकेशन सोसायटी'चे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

Sinhgad Education Society : सिंहगड एज्युकेशन सोसायटीतील २७ शिक्षकांचे तब्बल पाच कोटी सहा लाख रुपयांचे वेतन थकवून त्याचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सहा जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maruti Navale
Maruti NavaleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सिंहगड एज्युकेशन सोसायटीतील २७ शिक्षकांचे तब्बल पाच कोटी सहा लाख रुपयांचे वेतन थकवून त्याचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सहा जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेपाच वर्षांपासून वेतन न मिळाल्याने शिक्षकांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमधील एका शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थापक मारुती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले-अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले, लेखा विभागातील संजय मोरे, शरद जराड यांच्यासह अन्य विश्वस्तांविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिक्षिका एप्रिल २०२० पासून सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये कार्यरत आहेत. मात्र, त्यानंतर संस्थेकडून त्यांना नियमित वेतन देण्यात आले नाही. गेल्या साडेपाच वर्षांत त्यांच्या १९ लाख ३६ हजार रुपयांच्या वेतनाची थकबाकी झाली. त्याचप्रमाणे संस्थेतील एकूण २७ शिक्षकांचे मिळून पाच कोटी सहा लाख रुपयांचे वेतन थकीत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

थकीत वेतन मिळावे यासाठी संबंधित शिक्षकांनी संस्थेकडे वारंवार पाठपुरावा केला. तसेच विविध स्तरांवर दाद मागण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. अखेर शिक्षकांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

Maruti Navale
Parbhani News: उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत शिंदेंची शिवसेना का गाठली? खासदार संजय जाधवांनी सगळंच सांगून टाकलं

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, वेतन नोंदी आणि संस्थेच्या लेखा व्यवहारांची छाननी करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या थकीत वेतनाबाबत आणखी काही बाबी तपासातून समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com