Shrirang Barne Sarkarnama
पुणे

Maval Lok Sabha Election : बारामतीनंतर मावळात बंडाळी; महायुतीत चाललंय तरी काय?

उत्तम कुटे

Pune Political News : गत विधानसभेला अजित पवारांनी ठरवून केलेल्या पराभवाचा बदला आता लोकसभेला घ्यायचा, अशी घोषणा करत बारामती लोकसभा मतदारासंघातून दंड थोपटले. शिवतारेंनंतर मावळातही भाजयमोच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावरच महायुतीत नेमके चाललेय तरी काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. Maval Lok Sabha Election

महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) नेते विजय शिवतारेंनी बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याचे आवाहन केले. शिवतारेंच्या भूमिकेनंतर मावळातील भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नितीन मराठे यांनी युतीतील शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीविरोधात भूमिका घेतली. मावळात भाजपने शिवतारेंसारखा पवित्रा घेतल्याने चर्चेचा विषय झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठेंसह मावळ भाजपनेही बारणे उमेदवार नकोच अशी ताठर भूमिका घेतल्याने स्वतःहून आपली उमेदवारी तेथे जाहीर केलेले विद्यमान खासदार बारणेंचे (Shrirang Barne) टेन्शन वाढले आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगितले, तरी बारणेंचे काम करणार नाही, असा बंडाचा झेंडा मराठेंनी शनिवारी पत्रकापरिषद घेऊन फडकावला. तर, मतदारसंघात शिवसेनेपेक्षा पक्षाची ताकद कितीतरी जास्त आहे. त्यामुळे मावळ लढवण्याची आणि तेथून माजी मंत्री बाळा भेगडेंना तिकीट देण्याची मागणी भाजपने केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही, शिवतारेंचा बंडाचा पवित्रा कायम राहिला आहे. तसाच तो मराठेंचाही राहतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.

बारणे हे लादलेले उमेदवार असून त्यांची उमेदवारी कायम ठेवली, तर पक्षश्रेष्ठींनी सांगितले, तरी त्यांचे काम करणार नाही, उलट नोटा दाबू,असा इशारा मराठेंनी पत्रकारपरिषद घेऊन आज दिला.यावेळी मावळ (Maval) पक्षाला का व कसा मिळावा, हे भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रेय गुंड यांनी सांगितले. बारणेंमध्ये अहंकार आला असून भाजपची गरज नसल्यासारखे ते वागू लागले आहेत, असा हल्लाबोल मराठेंनी यावेळी केला. त्यांनी मावळात येऊन भेगडेंची उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

भेगडेंचेही मराठेंच्या मागणीला बळ

निवडणूक जिंकायची असल्याने कार्यकर्त्यांची भूमिका आणि भावना समजून घेतल्या पाहिजेत, या शब्दांत बाळा भेगडे (Bala Bhegde) यांनी मराठेंसह मावळ भाजपच्या बंडाच्या पवित्र्याला पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांच्या या भावना नेतृत्वाने जाणून घेणे महत्वाचे असून त्यानंतरच निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच उमेदवारी मागणे चूक नाही, असेही ते म्हणाले. पहिल्यांदा त्यांनी जाहीरपणे अशी भूमिका मांडण्याचे धाडस दाखवत स्वतःची दावेदारी दाखवली. २०२४ ची तयारी २०२० पासून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT