Maval Lok Sabha 2024 Sarkarnama
पुणे

Maval Lok Sabha 2024: शिवसेनेचे स्टार प्रचारक गोविंदा विसरले उमेदवाराचेच नाव, भाजप आमदाराने करून दिली आठवण

Sudesh Mitkar

Pune News: मावळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार ताकद मावळात लावण्यात आली आहे. त्यामुळे मावळ महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (MP Srirang Barne) यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा यांना धाडण्यात आलं होतं.

मात्र पत्रकारांशी बोलताना गोविंदा (Actor Govinda) उमेदवाराचे नावच विसरलाचे समोर आले. त्यावेळी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी त्यांना आठवण करून दिली. सध्या ही गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे.

शिवसेना शिंदे गट आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर अभिनेता गोविंदा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी गोविंदा उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे घेऊ लागला.

मात्र या दरम्यान त्यांनी उमेदवारचे नावचं आठवलं नाही. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या भाजप आमदाराने (BJP MLA Uma Khapre) त्यांना नावाची आठवण करून दिली. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि चर्चांना उधाण आले आहे.

महायुतीचे आणि अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे स्टार प्रचारक म्हणून गोविंदा उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांना मुंबईतून उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

गोविंदा स्टार प्रचारक म्हणून राज्यभर महायुतीचा प्रचारासाठी फिरत आहेत. याचप्रमाणे अनेक वेळा अभिनेतांना आणि फिल्मस्टारला प्रचारामध्ये आणण्याचं अनेक घटना घडल्या आहेत. या स्टार प्रचारकांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जरी जमत असली तरी त्याचा उमेदवारांना किती फायदा होतो याचं गणित मात्र आत्तापर्यंत कोणालाच सुटलेलं नाही.

दरम्यान या स्टार प्रचारकांना जर आपण कोणाचा प्रचार करायला आलोय त्याचं नावच माहिती नसेल तर ते इतरांना त्यांना मतदान करण्याचा आव्हान कशाप्रकारे करणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

यावेळी बोलताना गोविंदा यांनी देशाचा जगभरामध्ये नावलौकिक वाढला असून महाराष्ट्रातील नेते देशातला पुढे नेण्यासाठी हातभार लावत आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त प्रतिनिधी पाठवून देशाला आणखीन विकसित करण्यासाठी हातभार लावण्याची गरज असल्याचं आव्हान त्यांनी यावेळी केले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT