Maval Lok Sabha Constituency: देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू आहे. विविध लोकसभा मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. अशातच मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
शेवटच्या दिवशी मावळ लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून माधवी जोशी (Madhavi Joshi) यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आतापर्यंत मावळ मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे (Srirang Barne) आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, आज शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार असल्यामुळे आता मत विभागली जाणार असून, याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला (Shivsena) की ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत येथील माधवी जोशी या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, महाविकास आघाडीत मावळची जागा ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे जोशी यांनी वंचितमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.