Nashik Lok Sabha: राष्ट्रवादी हट्टाला पेटली, नाशिकचा मतदारसंघ भुजबळांना सोडा!

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघासाठी हट्टाला पेटला आहे. आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महायुतीने हा मतदारसंघ भुजबळ यांच्यासाठी सोडावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Chhagan Bhujbal, Hemant Godse
Chhagan Bhujbal, Hemant Godsesarkarnama
Published on
Updated on

Nashik Loksabha Election 2024: मागील अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून मतभेद असल्याचं दिसत आहे. अद्याप युतीतील नेत्यांना यावर तोडगा काढण्यात यश आलेलं नाही.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघासाठी हट्टाला पेटला आहे. आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महायुतीने हा मतदार संघ भुजबळ यांच्यासाठी सोडावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे संपर्क केला जाणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्ष कार्यालयात झाली. समता परिषदेच्या काल झालेल्या बैठकीनंतर ही बैठक होती. या दोन्ही बैठकांमध्ये नाशिक मतदारसंघातून (Nashik Constituency) छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा करण्यात आली.

महायुतीने नाशिकच्या जागावाटपाबाबत दीर्घकाळ चर्चा केली आहे. मात्र, हा प्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे आता ही जागा अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोडण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज झालेल्या बैठकीत नाशिक मतदारसंघाबाबत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली जाणार आहे. हा मतदारसंघ पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सध्या नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अनुकूल राजकीय स्थिती आहे. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कारकिर्दीत शहरात मोठी विकासकामे झाली आहेत.

या सगळ्यांचा मतदारांवर मोठा प्रभाव आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, जो पक्षाचा निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल. महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन त्यासाठी काम करतील असे मत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी या वेळी मांडले.

Chhagan Bhujbal, Hemant Godse
Chhagan Bhujbal News : 'शिरूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन...', अमोल कोल्हेंच्या दाव्यावर छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी नाशिक मतदारसंघासाठी राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. त्यांनी त्यासाठी कामही सुरू केले होते. मात्र महायुतीत जागावाटपाबाबत एकमत होत नव्हते.

त्यामुळे या वादातून त्यांनी माघार घेतली होती. त्याबाबतची भूमिकादेखील त्यांनी जाहीर केली आहे. अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा आहे. हा विचार करता आगामी निवडणुकीसाठी महायुतीने नाशिक चमकदार संघ अजित पवार गटाला सोडावा असा आमचा आग्रह आहे.

Chhagan Bhujbal, Hemant Godse
Jayant Patil News : जयंत पाटलांनी यासाठी मानले गृहमंत्री फडणवीसांचे आभार, म्हणाले..!

मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीचे संकेत देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबतची माहिती दिली होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर आज याबाबतची घोषणा अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गोटात अतिशय वेगाने हालचाली घडत आहेत. त्यामुळे नाशिक मतदारसंघ आणि तेथील उमेदवार दोन्हीबाबत धक्कादायक निर्णय येऊ शकतो, आता महायुतीचे कार्यकर्तेदेखील याबाबत तशीच अपेक्षा करीत आहेत.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com