Crime News : मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या लढत होत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, ऐन मतदानाच्या दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले यांना पोलिसांनी अटक केली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका सचिन भोसले यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मावळ लोकसभा Maval Loksabha मतदार संघातील चिंचवड येथील बारणे शाळेत सचिन भोसले मतदान करण्यासाठी केंद्रावर गेले असता मतदान यंत्र उलटे लावल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी मतदान केंद्रात व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यात आणि उपस्थित असलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचारी, पोलिसांमध्ये Police वाद झाला. मशीन उलटे लावल्याचा जाब विचारल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा भोसले यांनी दावा केला आहे. तर, तर मतदान यंत्रे चुकीचे लावण्यात आलेले नव्हते. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
डीसीपी बापू बांगर यांनी सांगितले की, सचिन भोसले हे नागु बारणे प्रशालेचा मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी आले होते. बाहेरून त्यांनी मोबाईल मागून घेऊन मतदानाचे मशीन उलट्या क्रमाने लावलेले आहे. याबाबतचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करून नमूद वेळी मतदान प्रक्रिया राबविणारे अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करून शासकीय कर्तव्य निभावण्यामध्ये अडथळा आणल्याने सचिन भोसले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करून न्यायालयामध्ये पाठविण्यात आलेले आहे.
दरम्यान मावळ मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकीमध्ये सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. यंदा दुपारी तीन पर्यंत मतदानाची टक्केवारी 36 टक्के मतदान झाले होते. दोन्ही उमेदवारांची धडधड वाढली आहे. मतदारांना बाहेर काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या यंत्रणा काम करत असल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.