Pune Police News: मतदानापूर्वी पुणे पोलिस अलर्ट; 9 हजार 255 गुंडांची झाडाझडती; पैसे वाटपावर लक्ष

Pune Lok Sabha Election 2024: पोलिसांकडून दररोज मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून, गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. आता पर्यंत.९ हजार २५५ गुंडांपैकी ३ हजार २४९ गुन्हेगार सापडले आहेत.
Pune Police News
Pune Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या वेळी गुंडांचा वापर केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. यानंतर महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील निवडणुकीच्या (Pune Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात येणार असल्याचा आरोप महायुतीवर केला आहे. पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी (Pune Police Alert) म्हणून शहरातील तब्बल 9255 गुंडांची झाडझडती घेतली आहे.

पुणे लोकसभा निवडणुकिसाठी उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पुणे पोलिसांनी खबरदारी घेत गुंडांची झाडाझडती घेतली आहे. त्याचबरोबर समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संस्था संघटना, व्यक्ती, रेकॉडवरील आरोपी, गंभीर गुन्ह्यांत जामीन बाहेर असलेले सराईत, तसेच छोटा मोठा गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या गुंडांची पोलिसांनी चौकशी केली आहे.

Pune Police News
Devendra Fadnavis: फडणवीसांची कबुली; ठाकरेंना ओळखू शकलो नाही, त्यांना १९९५ पासूनच मुख्यमंत्री...

शहरात मागील काही काळापासून शहरात गोळीबाराच्या घटना घडल्या. कोयता गँगची दहशत, टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडल्या आहेत. उमेदवारांकडून गुंडांच्या वापराबाबत आरोपी करण्यात येत आहेत, या पार्श्‍वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी होत आहे. मतदान प्रक्रियेला कोणतेही गालगोट न लागता पार पाडण्यासाठी पोलिसांनी या गुंडांना सज्जड दम भरला आहे.

यासाठी पोलिसांकडून दररोज मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून, गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. आता पर्यंत.९ हजार २५५ गुंडांपैकी ३ हजार २४९ गुन्हेगार सापडले आहेत. त्यातील परिमंडळ एकच्या हद्दीत ११ जणांना जामीनपात्र, अजामीनपात्र वॉरंट पोलिसांनी बजावले आहे. तसेच वेळ न पाळणाऱ्या २३ संस्था आणि कार्यालयांवर कारवाई केली.

  • सात गुन्हे दाखल करून आरोपींच्या ताब्यातून २ तलवार, ४ कोयते व १ सुरा आदी शस्त्र जप्त केले आहेत.

  • ११ आरोपींवर तडीपार आदेशाचे भंगा केल्याप्रकरणी कारवाई केलेली आहे. आणि ६० जणांवर जामीनपात्र, अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.

  • नाकाबंदीदरम्यान ३ हजार १४४ संशयित वाहन चालकांची तपासणी करण्यात आली.

  • ४४७ जणांवर कारवाई करीत ३ लाख ८५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

  • वाहतूक शाखेकडून २ हजार ४९३ संशयित वाहन चालकांची तपासणी.

  • ४७३ जणावंर कारवाई करुन ४ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com