Pune News : भाजप खासदार मेधा कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. अशातच मेधा कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण सुरू असल्याचा दावा देखील केला आहे.
मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वी सारसबाग परिसरातील खाऊ गल्लीमध्ये विशिष्ट धर्मियांच्या होणाऱ्या गर्दी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यानंतर वक्फ बोर्डाकडून सामान्यांच्या जमिनी हडप करण्यात येत असल्याचा देखील दावा त्यांनी केला होता.
त्यानंतर आता शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण सुरू असल्याचा दावा करणारा व्हिडिओ मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केला आहे. व्हिडिओच्या आधारे शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे, असे मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
याबरोबर त्यांनी चलो शनिवारवाड्याची हाक दिली असून रविवारी सायंकाळी त्यांनी कसबा पोलीस ठाण्यासमोर एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत कुलकर्णी म्हणाल्या, शनिवार वाडा हे पुण्याचे वैभव आहे. ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय आहे. पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? असे सवाल करत चला, आपण सर्वजण एकत्र येऊआणि शिव वंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया! असे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, आम्ही पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही घटना घडल्याचे कबूल केले असून तातडीने या नागरिकांना बाहेर काढण्यास सांगितले आहे. एखाद्या शुक्रवारी ही घटना घडल्या असल्याचे देखील त्यांच्याकडून कळवण्यात आले आहे. ही घडलेली घटना अत्यंत चुकीची असून या ठिकाणी ज्या पद्धतीने पारंपारिक गणेश उत्सव साजरा होत होता, तो करण्यास नकार दिला जातो मात्र नमाज पठण कसे करू दिले जाते, असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.