सुदेश मिटकर
Pune Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या 5863 घरांच्या विक्रीकरिता 24 नोव्हेंबर 2023 रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. ती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून, लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे मंडळ ( Pune Latest News In Marathi ) क्षेत्रातील 5863 घरांच्या सोडतीच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ दि. 05 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आला होता. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अंतिम मुदतीत 60 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या सोडतीसाठी म्हाडा मंडळातर्फे अर्ज दाखल करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कुठे आणि किती घरं!
म्हाडाच्या या सोडतीत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 5425 सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दरम्यान, म्हाडाकडून बुधवारी सायंकाळी अर्जदारांना मेसेजद्वारे सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे कळवले होते. तसेच पुढील तारीख मेसेजद्वारे कळवण्यात येणार असल्याची म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी सोडतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांचा हिरमोड झाला आहे.
Edited By Sachin Fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.