Pune News : कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना शोधण्यासाठी पुण्यात पोलिसांची धावपळ; नेमकं काय झालं...

PMC Sanitation Workers : ते गुन्हेगार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला
koyta
koytaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न सध्या पडलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे.

शहरात पुन्हा कोयता गँगने दहशत माजविण्यास सुरुवात झाली आहे. कोयता गँगला रोखण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याचे चित्र आहे. अशातच दुचाकीवरून दोघे जण कोयता घेऊन निघाल्याचे सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना आढळल्याने तपासाची चक्रे फिरली, पण ते गुन्हेगार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया..

डहाणूकर कॉलनी परिरसरात रामदासजी कळसकर पथ नामफलकासमोर झाड वाढल्याने नाव झाकले गेले होते. तेथील झाडे-झुडपे कापून सफाई करावी, अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात केली होती.

हे झाड तोडण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. आरोग्य कोठडीतून हे दोघे कोयते घेऊन दुचाकीवरून डहाणूकर कॉलनीकडे निघाले. झाड तोडून ते पुन्हा दुचाकीवरुन कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडे निघाले.

दरम्यान, दुचाकीवरील एकाच्या हातात कोयता असल्याचे पोलिसांच्या सीसीटीव्हीने टिपले. त्यानंतर हे सीसीटिव्हीचे हे चित्रीकरण पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला पाठविण्यात आले.

त्यानंतर हे चित्रीकरण अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांना पाठविण्यात आले , त्यांनी "कोयता बाळगणाऱ्यांना पकडा" असा आदेश दिला, यंत्रणा कामाला लागली. पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, आशिष राठोड, पोलिस कर्मचारी निशिकांत सावंत यांचे पथक दुचाकीवरील दोघांचा शोध घेण्यासाठी निघाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

koyta
IPS Tushar Doshi : लाठीमार प्रकरणी चर्चेत आलेल्या तुषार दोशींची गुन्हे विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती!

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर व मुकादम वैजिनाथ गायकवाड हे अलंकार पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी सीसीटीव्ही पाहिले.

त्यांनी कोयता बाळगणारे महापालिकेचे सफाई कामगार असल्याचे सांगितले. ते कोयता गँगमधील गुन्हेगार नाहीत, असे त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही सफाई कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलविले.

पोलिस ठाण्यात बोलविल्यामुळे ते घाबरले. "गवत आणि फांद्या कापण्यासाठी कोयते, कुऱ्हाडींचा वापर करतो," असे त्यांनी सांगितले. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

उघड्यावर कोयते आणि कुऱ्हाडी घेऊन फिरू नका, महापालिकेने कोयते आणि कुऱ्हाडींची नोंद ठेवावी. कोयते, कुऱ्हाडी झाकून नेल्यास नागरिकही भीतीपोटी तक्रार देणार नाहीत," असे पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांनी सांगितले. कामाची नोंद, तसेच छायाचित्रे काढून ठेवा, असे पोलिसांनी त्या सफाई कर्मचाऱ्यांना सांगितले.

koyta
ShivSena News: शिंदे गटातील महिलेच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाच्या चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com