Abhay Chhajed Congress
Abhay Chhajed Congress Sarkarnama
पुणे

Congress Vs Bjp : एमआयएमची उमेदवारी हे भाजपचे पडद्यामागील षडयंत्र ! काँग्रेसचा आरोप

Sudesh Mitkar

Pune News : पुणे लोकसभेची निवडणूक आतापर्यंत तिरंगी होईल असं बोललं जात होतं. मात्र, आता एमआयएमनेदेखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे आता ही लढत चौरंगी पाहायला मिळणार आहे.अनिस सुंडके यांनी एमआयएमकडून निवडणूक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयावरती काँग्रेसकडून मात्र शंका व्यक्त करण्यात आली आहे. अनिस सुंडके यांची उमेदवारी जाहीर करण्याचे पडद्यामागील षडयंत्र भारतीय जनता पक्षाने रचले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केला.

छाजेड म्हणाले, अनिस सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , अजित पवार गट (NCP) यामध्ये होते. पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पराभवाच्या भीतीपोटी भाजपने अनिस सुंडके यांचा एमआयएममध्ये प्रवेश घडवून आणला. त्यांना एमआयएमतर्फे पुण्यात उमेदवारी मिळेल अशी व्यवस्था केली हे स्पष्ट दिसत आहे. सुंडके यांनी अनेक वेळा सोयीस्कर भूमिका घेऊन पक्ष बदलले आहेत. त्यामुळेच त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, अशा एमआयएम उमेदवाराला मुस्लिम समाज मतदान करणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस (Congress) पक्षाने बहुसंख्याकांप्रमाणेच अल्पसंख्याक समाजासाठीदेखील मोठे योगदान दिले असून, त्यामुळे अल्पसंख्याकांची मतेदेखील काँग्रेस पक्षाला पडतील आणि भाजपचे एमआयएमचा उमेदवार पुण्यात उभा करण्याचे षडयंत्र अयशस्वी होईल व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, अशा विश्वास ॲड. अभय छाजेड यांनी व्यक्त केला.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपने एमआयएमचे अनेक उमेदवार तिथल्या काँग्रेसविरोधी उभे करण्याचे षडयंत्र रचले होते. एमआयएम हा पक्ष भाजपचा “B टीम” म्हणून ओळखला जातो. देशामध्ये भाजपने (BJP) याच B टीमचा वापर केला आहे, मात्र, देशात आणि तेलंगणामध्येदेखील त्याचा फायदा भाजपला झाला नाही. तेलंगणामध्ये एमआयएमचे अनेक उमेदवार उभे करायला लावूनही काँग्रेस पक्ष सगळीकडे विजयी झाला व भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले, पुण्यातही असेच घडेल, असा विश्वास अभय छाजेड यांनी व्यक्त केला.

Edited By : Chaitanya Machale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT