Murlidhar Mohol News : अरे अशा हजारो तक्रारी करा..., असे मुरलीधर मोहोळ का म्हणाले !

Congress objected advertisement given by Muralidhar Mohol in the newspaper : मोहोळ यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवर काँग्रेसने आक्षेप घेत थेट आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे..
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून "राम मंदिर झाले आता राष्ट्र मंदिरासाठी संकल्प करूयात" या मथळ्याखाली जाहिरात करून धार्मिक प्रलोभन दाखवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने मोहोळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. यावर आता मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, ही तक्रार दाखल करून काँग्रेसचा श्रीरामाबद्दलचा द्वेष पुन्हा समोर आला असल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्याची ठोस अंमलबजावणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकाराला दिले आहेत. पुणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मोहोळ यांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवर काँग्रेसने आक्षेप घेत थेट आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत, असे छायाचित्रं असलेली पत्रकेदेखील मोहोळ यांच्यामार्फत वाटण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Murlidhar Mohol
Jayant Patil News : जयंत पाटलांनी काढला पोलिसांना चिमटा, म्हणाले..!

राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे सोशल मीडिया (Social Media) राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या वतीने मोहोळ यांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली होती. दिवसभर याबाबत जोरदार चर्चा सुरू होती.

काँग्रेसने (Congress) दिलेल्या या तक्रारीवर मोहोळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यानिमित्ताने काँग्रेसचे खरे रूप पुन्हा एकदा समोर आले. ज्यांनी शेकडो वर्षे ज्यांच्यासाठी प्रतीक्षा केली, अशा श्री रामाच्या मंदिरावरून तक्रार केली यामधून रामावर त्यांचे किती प्रेम आहे हे दिसते. राम मंदिराचा निकाल हा निवडणुकीनंतर द्या, अशी भूमिका काँग्रेसची होती. काँग्रेसने कायमच राम मंदिराला विरोध केला. रामाबद्दल त्यांच्या मनात द्वेष कायम आहे. रामाचा फोटो वापरला म्हणून तक्रार केली. अरे अशा हजार तक्रारी करा, पुणेकर तुम्हाला नक्की ओळखतात. तुम्ही श्रीरामाचा किती द्वेष करता ते, अशा शब्दांत मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

R

Murlidhar Mohol
MP Amol Kolhe News : पराभव समोर दिसू लागल्यानेच 'दादां'कडून वैयक्तिक टीका; खासदार कोल्हेंचा आरोप !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com