Tanaji Sawant and Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Ram Mandir Inauguration : राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण नाकारणं हे त्यांच्या कर्माचं फळ; मंत्री सावंतांचा ठाकरेंना टोला

Tanaji Sawant On Uddhav Thackeray: मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला...

Sudesh Mitkar

Pune News : अयोध्येमध्ये आज राम मंदिराचा सोहळा सुरू असताना महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये महाआरतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकीकडे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत असताना दुसरीकडे राम मंदिरावरून राजकारण सुरू आहे.

राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण काही ठराविक लोकांना देण्यात आलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्रातून प्रामुख्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं होतं. या दोन्ही नेत्यांनी या सोहळ्याला जाणं टाळलं. उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात पूजा करण्याचा निश्चय केला. यावरून सत्ताधारी पक्षातील नेते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सावंत म्हणाले, राम मंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी अनेकांनी बलिदान आणि त्याग केला आहे. आज राम मंदिर साक्षात येत असून त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्याला लाभलं आहे. राम मंदिर हे देशासाठी ठेवा असून हा ठेवा आपण जपायचा आहे, असं सावंत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण नाकारले. याबाबत तानाजी सावंत यांना विचारले असता सावंत म्हणाले, कदाचित त्यांच्या चालू कर्माचे ते फळ असेल. त्यांचं प्रारब्ध त्यांना उपभोगता आलं नाही, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न टाळला

याचवेळी तानाजी सावंत यांना मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. मात्र, तानाजी सावंत यांनी राम मंदिराबाबत आज प्रश्न विचारा, असं म्हणत मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्नांचे उत्तर देणं टाळलं.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT