Thane Politics: मंत्री रवींद्र चव्हाणांनी काढली विकास म्हात्रेंची समजूत ? दोघांचा एकाच गाडीतून प्रवास

Ravindra Chavan and Vikas Mhatre: माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
Ravindra Chavan and Vikas Mhatre
Ravindra Chavan and Vikas MhatreSarkarnama
Published on
Updated on

Dombivali News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी आपल्या माजी नगरसेविका पत्नीसह भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असणाऱ्या विकास म्हात्रेंची ते कशी समजूत काढणार यावर चर्चा रंगल्या होत्या.

मात्र रविवारी सायंकाळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला विकास म्हात्रेंनी आमदारांच्या बरोबरीने दिवे लावले. त्यामुळे विकास म्हात्रे यांची समजूत काढण्यात चव्हाण यशस्वी झाली की खासदारांच्या गटात येण्यासाठी विकास म्हात्रे यांनी हजेरी लावली, यासंदर्भात चर्चा रंगली आहे.

प्रतिक्रिया देण्यास दोघांचाही नकार

गेली अनेक वर्ष माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे हे भाजपचे नेते होते. त्यानंतर त्यांनी अचानक निधी मिळत नसून काम होत नाहीत, लोकं आम्हाला विचारतात तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचे ? असे सांगत राजीनामा दिला. ही माहिती त्यांनी एका पत्राद्वारे दिली होती. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबाबत मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारले असता त्यांनी केवळ धन्यवाद असा शब्द उच्चारत उत्तर देणं टाळलं होतं. त्यामुळे विकास म्हात्रे शिंदे गटात जाणार का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Chavan and Vikas Mhatre
Ram Mandir Pran Pratishtha : ठाण्यात 111 फुटांची अगरबत्ती ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रज्वलन

एकाच गाडीतून दोघे आले...

रविवारी सायंकाळी झालेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यातर्फे पार पडलेल्या दीपोत्सव सोहळ्यात विकास म्हात्रे आणि मंत्री आमदार रवींद्र चव्हाण एकत्र दिसले. त्यांनी एकत्र दिवे लावून झालेल्या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गाडीतून ते आले. त्यामुळे गाडीतच मंत्र्यांनी विकास म्हात्रे यांची समजूत काढली का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

विकास म्हात्रे शिंदे गटात जाणार का ?

माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपचे नेते विकास म्हात्रे यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे गटाचे नेते दिपेश म्हात्रे यांनी विकास म्हात्रे यांनी शिंदे गटात यावे, असा सल्ला दिला होता. त्यामुळे विकास म्हात्रे आता नेमके कुठे जाणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विकास म्हात्रे राजीनामा देण्याचं कारण काय ?

एकीकडे विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या माजी स्थायी सभापती म्हात्रे यांनी विकास कामासाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करतच आपल्यापदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये त्यांनी रस्त्यावरील खड्डे, पाणी यासारखे सर्व सामान्यांना महत्त्वाचे असलेल्या मुद्द्यांना अधोरेखित केले आहे. काम होत नसल्याने नागरिकांना सामोरे जाणे कठीण झाले असून भाजप (BJP) विरुद्ध असंतोष असल्याने त्यांनी राजीनामा दिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Ravindra Chavan and Vikas Mhatre
Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची ACB कडून झाडाझडती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com