Rahul Kul: भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात दौंडचे आमदार राहुल कुल यांचं नाव आल्यानं खळबळ उडाली आहे. ज्या मुलीचं अपहरण झाल्याचं सांगितलं गेलं त्या मुलीच्या आईनं राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण हे आरोप राहुल कुल यांनी फेटाळून लावले असून या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी निष्पक्षपणे करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ज्या महिलेनं राहुल कुल यांच्यावर आरोप केले आहेत, तिनं आधी आपल्या मुलीचं गावातीलच एका मुलानं अपहरण केल्याचा आरोप केला होता. पण संबंधित मुलीच्या ताज्या जबाबानुसार तिचं अपहरण झालेलं नसून ती स्वतःचं त्या मुलासोबत निघून गेली होती. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला आहे. त्यामुळं याप्रकरणाला आई-वडिलांच्या आरोपांव्यतिरिक्त वेगळं वळणं मिळालं आहे.
दरम्यान, आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेणारा मुलगा हा दौंडचे आमदार राहुल कुल यांचा कार्यकर्ता असून त्यानं आपल्या अपहरणाच्या दिवशीच आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला राहुल कुल यांचा फोटो ठेवत ठामपणे उभा असं कॅप्शन त्याला दिलं होतं. त्यामुळं या प्रकरणाला राहुल कुल यांचा पाठिंबा असल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. तसंच इतकं प्रकरण तापलेलं असताना राहुल कुल मला भेटायला का आले नाहीत? मी त्यांच्याच दौंड तालुक्यातील रहिवासी आहे, असा सवालही या मुलीच्या आईनं केला आहे.
मुलीच्या आईच्या आणि ग्रामस्थांच्या आरोपांना उत्तर देताना राहुल कुल यांनी म्हटलं की, मलाही एक मुलगी असून माझ्या घरातून महिला पदाधिकारी राहिल्या आहेत. त्यामुळं महिलांसदर्भातील प्रश्न कशा पद्धतीनं हाताळायचे याची मला जाणीव आहे. या विषयात मी पीडित मुलीच्या बाजुनं अतिशय भक्कम भूमिका घेतल्यामुळं जाणीवपूर्वक माझी बदनामी केली जात असल्याचं माझं प्राथमिक मत आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. माझी भूमिका निःपक्षपाती असून त्यामुळं काही लोक दुखावले गेले आहेत. म्हणूनच त्यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असावा"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.