

BJP alleges Rahul Gandhi role : भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटने संपूर्ण जगाचं लक्ष वेधले आहे. अनेक देशांतील नेत्यांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचा या समिटमध्ये सहभाग आहे. मात्र, आज या समिटदरम्यान मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अर्थनग्न होत या समिटमध्ये घोषणाबाजी केल्याने मोठा वाद उफाळून आला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समिटच्या व्यवस्थापनावरून दोन दिवसांपूर्वीच सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आज घडलेल्या या प्रकारावरून आता थेट या राड्याचे कनेक्शन राहुल गांधींशी जोडण्यात आले आहे. भाजप नेते या प्रकारावरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर तुटून पडले आहेत.
नेमकं काय घडलं?
नवी दिल्लीतील भारत मंडपमध्ये इंडिया एआय़ इम्पॅक्स समिट सुरू आहे. आज भारतीय युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते रीतसर नोंदणी करून या समिटमध्ये दाखल झाले. सुमारे ८ ते १० कार्यकर्त्यांनी अचानक अंगात घातलेली टी-शर्ट काढून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अर्धनग्न अवस्थेतील हे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत-अमेरिकेतील व्यापार करारावरून नारे देत होते.
मोठा गोंधळ निर्माण झाल्यानंतर त्याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या या कृतीचे समर्थन केले आहे. मीडिया आणि सरकार ऐकत नसल्याने कार्यकर्त्यांनी एआय समिटमध्ये आंदोलन करत लक्ष वेधल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
युवक काँग्रसेच्या या आंदोलनानंतर भाजपचे नेते संबित पात्रा यांनी गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने आज परदेशी पाहण्यांसमोर नंगानाच केला. राहुल गांधी यांच्या घरी त्यांच्यासह सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत हे षडयंत्र रचण्यात आले. ही भाजप विरुध्द काँग्रेस अशी लढाई नाही, तर ही लढाई भारत विरूध्द भारताची प्रतिमा खराब करू इच्छिणाऱ्या शक्तींविरोधात आहे, पात्रा यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.