Sunil Shelke  Sarkarnama
पुणे

Sunil Shelke News : आमदार शेळके टोल नाक्यावर उभे राहिले अन् एका झटक्यात वाहतूक कोंडी सुटली

Pimpri Chinchwad Political News : आमदार शेळके यांनी वरचेवर टोल नाक्याला भेट द्यावी...

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : सलग सुट्यांमुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील नाही,तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही रविवारी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. त्याला जुन्या हायवेवरील सोमाटणेचा (ता.मावळ) टोल नाका कसा अपवाद राहील? एक किलो मीटरपर्यंत तेथे वाहनांच्या रांगा लागल्या. हे पाहून स्थानिक आमदार मावळचे सुनील शेळके हे स्वत टोल नाक्यावर आले अन् काही वेळातच ही कोंडी फुटली,वाहनांची रांगही सुटली.

सोमाटणे टोल नाक्य़ावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूस लागल्या असून, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे समजताच आमदार सुनील शेळके(Sunil Shelke) टोल नाक्यावर आले. तेथे टोल घेणाऱ्या खिडकीजवळ थांबले.ते आणि त्यांचा सुरक्षारक्षक पोलिस आणि पीएने वाहने सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे खूप वेळ उभ्या असलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

कारण त्यांची रांगेतूनच नाही,तर टोलमधूनही सुटका झाली. एक किलोमीटर लांब पसरलेली पुणे आणि मुंबईकडील बाजू काही वेळातच मोकळी झाली. त्यानंतर आमदार शेळके यांनी टोल नाक्यावरून काढता पाय घेतला. त्यांनी वरचेवर अशी टोल नाक्याला भेट द्यावी,अशी मिश्किल टिप्पणी एका मोटारचालकाने दिली. (Pimpri Chinchwad)

सोमाटणे टोल नका आणि वाहनांच्या रांगा आणि कोंडी हे विशेषतः सुट्यांच्या दिवशी आठवड्याच्या शेवटी समीकरणच झालेले आहे. दीड वर्षापूर्वीही अशा मोठ्या रांगा सुटीच्या दिवशी आठवड्याच्या शेवटी लागल्याचे दिसताच त्यावेळीही आमदार शेळके यांनी सोमाटणे टोल नाक्यावर धाव घेतली.(Latest Marathi News)

आमदार शेळके यांनी काही दिवसांपूर्वीच महामार्गावर स्वत: तेथे उभे राहून वाहने सोडली. कोंडी फोडली. वाहनांची लांबच लांब रांग मोकळी केली होती. त्याची पुनरावृत्ती रविवारी पुन्हा झाली. कारण सलग सुट्यांमुळे पुणे-मुंबई जुना आणि नवा असे दोन्ही हायवे त्यातही टोल नाके जाम झाले.सोमाटणेलही त्याला अपवाद राहिला नाही. त्यामुळे स्थानिक आमदार म्हणून शेळकेंनी पुन्हा धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT