Ajay Maken News: काँग्रेसचा मोठा निर्णय; राहुल गांधींचे निकटवर्तीय अजय माकन यांच्यावर मोठी जबाबदारी

Congress : याआधी पवन कुमार बन्सल हे काँग्रेसचे खजिनदार म्हणून काम पाहत होते.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा सध्या राजकीय पक्षांनी धडाका लावला आहे. यातच आता काँग्रेसनेदेखील पक्षात मोठा बदल केला आहे.

काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून अजय माकन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय माकन हे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. याआधी पवन कुमार बन्सल हे पक्षाचे खजिनदार म्हणून काम पाहत होते. मात्र, आगामी निवडणुका पाहता आता खजिनदार म्हणून अजय माकन यांची निवड करण्यात आली आहे.

Rahul Gandhi
Tahsildar Recruitment on Contract : कंत्राटी तहसीलदार भरती तडकाफडकी रद्द; महसूलमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

याबरोबरच लवकरच काँग्रेसचे अनेक राज्यांचे प्रभारीदेखील बदलण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या जबाबदाऱ्याही बदलल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या अनुषंगानेच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी खजिनदार म्हणून अजय माकन यांची नियुक्ती केली आहे.

आगामी काळात होणाऱ्या निवडणुका पाहता काँग्रेसने हा बदल केला असून, यापुढेही अनेक नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसने आगामी रणनीती आखण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.

कोण आहेत अजय माकन ?

अजय माकन हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. माकन हे दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिलेले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Rahul Gandhi
MLA Sukhpal Khaira Arrest : ड्रग्ज प्रकरणात काँग्रेसचा आमदार अडकला; पंजाब पोलिसांची मोठी कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com