भोर (जि. पुणे) : भोर (Bhor) तालुक्यातील आंबवडे खोऱ्यातील म्हाकोशी ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणुकीत (Election) मतदारांच्या कौलाची चर्चा होताना दिसत आहे. कारण म्हाकोशी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वाधिक मते ही नोटाला (Nota) मिळाली आहेत. त्यानंतरही दोन नंबरची मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे भोरमधील या निकालाची पुणे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. (More votes for 'NOTA' than Mhakoshi candidates in Bhor taluka)
याशिवाय, पुणे-सातारा महामार्गावरील वागजवाडी आणि भोर शहराजवळील सांगवी-हिमा ग्रामपंचायतीमध्ये दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर विजयी उमेदवार ठरविण्यात आला. तसेच, वागजवाडीचे सरपंच हे केवळ एका मतानी विजयी झाले आहेत. या तीनही ग्रामपंचायतींच्या अनोख्या मतमोजणीची चर्चा तालुक्यात होत आहे.
म्हाकोशी ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक एकमध्ये सदस्यपदाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. संगीता सोपान तुपे यांना १२३ मते मिळाली, त्यामुळे त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. मात्र त्याखालोखाल नोटा क्रमांक एकला २८ आणि नोटा क्रमांक दोनला १०४ मते पडली. त्यामुळे एकाच वॉर्डात नोटाला कोणत्याही उमेदवारापेक्षा ९ मते अधिक मिळाली आहेत.
याच वॉर्डातील दुसरे उमेदवार रेखा विजय साळेकर यांना ४३ आणि तिसऱ्या उमेदवार कविता राजेंद्र शेडगे यांना ४२ मते मिळाली आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी निवडणूक निरीक्षक राजेंद्र कचरे व राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ४३ मते मिळविणाऱ्या रेखा साळेकर यांना विजयी घोषित केले आहे.
वास्तविक म्हाकोशीत सर्वाधिक १३२ मते नोटाला मिळाली आहेत. पण, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला विजयी घोषित करण्याचा नियम आहे, त्यानुसार त्यांचा विजय घोषित करण्यात आलेला आहे.
वागजवाडी ग्रामपंचायतीमध्ये निकीता आवाळे या केवळ एका मताने विजयी झाल्या आहेत. वाजगवाडीमध्ये प्रभाग क्रमांक २ मध्ये संतोष राऊत व अजित राऊत यांना समान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीवर संतोष राऊत विजयी झाले. सांगवी-हिमामध्ये महेंद्र रवळेकर व कौशल बांदल यांना समान मते मिळाली, यामध्ये कौशल बांदल हे चिठ्ठीवर विजयी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.