राणा पाटलांसह काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी गड राखले; शिंदे गटाचा मात्र प्रभाव दिसेना

महाविकास आघाडीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झाले असून बहुतांश ठिकाणी कारभाऱ्यांनी आपले पारंपारिक गड राखले आहेत.
Ranajgajit Singh Patil-Tanaji Sawant
Ranajgajit Singh Patil-Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

उस्मानाबाद : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये (Garm Panchayat) स्थानिक आघाड्यांची सरशी पाहायला मिळाली. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपला (BJP) चांगले यश मिळाले असले तरी शिंदे गटाला (Eknath Shinde) मात्र फारसा प्रभाव पाडता आला नाही. विशेष म्हणजे शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे याच जिल्ह्यातून येतात. त्यानंतरही शिंदे गटाचा फारसा प्रभाव या निवडणुकीत दिसलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झाले असून बहुतांश ठिकाणी कारभाऱ्यांनी आपले पारंपारिक गड राखले आहेत. (Established leaders maintained their strongholds in Gram Panchayat elections in Osmanabad)

उस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाल्यानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. निकाल हाती येताच कार्यकर्ते हालगीच्या तालावर नाचत जल्लोश करीत होते.

Ranajgajit Singh Patil-Tanaji Sawant
‘...तर भारत जोडो यात्रा तातडीने थांबवा’ : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांस गावात स्थानिक आघाड्या करूनच सत्ता ताब्यात मिळविण्यात कारभाऱ्यांना यश आले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील प्रमुख असलेल्या ढोकी गावात काँग्रेसचे अमोल समुद्रे यांनी सत्ता कायम ठेवली आहे. तेथे भाजपसह शिवसेनेचा पराभव झाला आहे. कसबे-तडवळे गावात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांच्या पॅनलला महाविकास आघाडीकडून पराभव स्विकारावा लागला आहे. येडशीमध्ये मात्र सरपंच म्हणून डॉ. सोनिया पवार सुशिक्षित उमेदवाराला मतदारांनी निवडून दिले आहे. येथे भाजप आणि महाविकास आघाडीला मतदारांनी डावलले आहे. तेरचा गड राखण्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना यश आले आहे.

Ranajgajit Singh Patil-Tanaji Sawant
चंद्रकांत पाटलांनी सभा घेतलेल्या गावांत भाजप समर्थक पॅनेलचा धुव्वा : राष्ट्रवादीची बाजी

तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून काँग्रेसने भाजपकडून सत्ता खेचली आहे. चिवरीत मात्र भाजपने काँग्रेसकडून सत्ता मिळविली आहे. तालुक्यात भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायती मिळविल्याचा दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही चांगले यश मिळाले आहे. लोहाऱ्यातही अशीच स्थिती असून बहुतांश ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीला मतदरांनी पसंती दिली आहे.

Ranajgajit Singh Patil-Tanaji Sawant
वेल्ह्यात काँग्रेसची सरशी : तालुकाध्यक्षाच्या गावातच राष्ट्रवादीचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत

कळंब तालुक्यातील मोहा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून बाबा मडके यांच्या ताब्यातून ग्रामपंचायत खेचून घेण्यात जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके यांना यश आले आहे. डिकसळ ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. खामसवाडीत मात्र अमोल पाटील यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला यश मिळवून दिले आहे.

Ranajgajit Singh Patil-Tanaji Sawant
बारामतीत धक्कादायक निकाल : राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षाचा तरुणाकडून दारुण पराभव

शिराढोण ग्रामपंचायतीत पद्माकर पाटील यांनी सत्ता कायम राखली आहे. उमरगा तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेला जास्त ग्रामपंचायती ताब्यात मिळाल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादी, शिवसेनेनेही आपले गट ताब्यात ठेवले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com