भुजबळांचे ‘ते’ विधान.... सत्ताधाऱ्यांचा प्रचंड गोंधळ...अखेर अजितदादांची दिलगिरी!

अपमानांची काय मोनोपली आहे की काय?
Ajit Pawar
Ajit PawarVidhan Sabha
Published on
Updated on

नागपूर : माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुंबईसंदर्भात (Mumbai) बोलताना केलेले विधान आणि भाजप आमदार मनीषा चौधरी (Manisha Chaudhary) यांना एकेरी भाषेत बोलल्यावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण देऊनही समाधान न झाल्याने अखेर अजितदादांनी भुजबळांच्या त्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरही सत्ताधारी आमदारांकडून गोंधळ करण्यात आला. अखेर विरोधी पक्षाच्या आमदारांनीही शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देत सभात्याग केला. (Ajit Pawar finally apologized for Bhujbal's statement)

विधानसभेत आज (ता. २१ डिसेंबर) पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू होती. त्यावर बोलताना भुजबळ यांनी ‘मुंबई म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ असा उल्लेख केला. त्यावर आमदार मनीषा चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भुजबळ यांनी रागावून त्यांना ‘ए बस खाली, ए बस खाली,’ असे म्हणाले, असा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला. ते म्हणाले की, तुम्ही मुंबई, सावरकर, सरस्वती, साधुसंतांचा अपमान करणार. अपमानांची काय मोनोपली आहे की काय? ज्या शहराने तुम्हाला दोनदा महापौर, आमदार केले, स्वातंत्र ओळख मिळवून दिली. त्या शहराबद्दल तुम्ही असे बोलता. तसेच, हा एकट्या मनीषा चौधरी यांचा अपमान नाही, तर सर्व महिलांचा अपमान आहे, त्यामुळे भुजबळ यांनी सर्व महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार सागर यांनी केली.

Ajit Pawar
जयंत पाटील-आबा गटाने राष्ट्रवादीला सांगलीत बनविले ‘नंबर वन’: भाजपची मुसंडी; काँग्रेसची पिछेहाट

व्हिडिओ चुकीचा असेल तर मी माफी मागेन, असे आव्हानही दिले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना ‘भुजबळ हे खाली बसा,’ असे म्हटल्याचे सांगितले. त्यावर सत्ताधारी पक्षाकडून गोंधळ घालण्यात आला. त्या गोंधळात अजित पवार यांनी मुंबई ही सर्वांची आहे. मुंबईबाबत कोणीही असे वक्तव्य करू शकत नाही, असे सांगितले.

Ajit Pawar
राणा पाटलांसह काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी गड राखले; शिंदे गटाचा मात्र प्रभाव दिसेना

विरोधी पक्षनेते पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर सत्ताधारी आमदारांकडून गोंधळ घालण्यात आला. त्यावर तालिका अध्यक्षांनी व्हिडिओ पाहून विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील, असे सांगितले. त्यानंतरही सत्ताधारी आमदारांनी पुन्हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढताना पाहून अखेर अजित पवार उठून जागेवर उभे राहिले. त्यांनी ‘महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही लोकांनीच घेतला आहे. त्यानंतर ते ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे कामही आम्हीच केले आहे. महिलांना नेहमी सन्मानाची वागणूक आणि पुरुषांच्या बरोबरींनी त्यांना संधी मिळावी, अशी आमची आग्रही भूमिका आहे. आर्थिक बाबतीत सक्षम करणे, त्यांना अधिकार देणे, हे आमचे धोरण आहे. तरीदेखील काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’ अशा शब्दांत भुजबळ यांच्या त्या विधानावरून उठलेल्या वादळावर पडदा टाकला.

Ajit Pawar
‘...तर भारत जोडो यात्रा तातडीने थांबवा’ : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

अजित पवारांच्या दिलगिरीनंतर आमदार भुजबळ बोलायला उठले. त्यांनी पुन्हा ते विधान वाक्यप्रचार म्हणून वापरले असे स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यावरून सत्ताधारी आमदारांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावर भुजबळांनी राज्यपाल फुले यांच्याविषयी वाईट शब्दांत बोलले. त्यांचा निषेध हे सत्ताधारी आमदार करणार असा सवाल केला. त्यानंतर जयंत पाटील यांनी राज्यपाल, मंत्री हे शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलतात, त्यांचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी शिवाजी महाराज की जय म्हणत सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com