MP Amol Kolhe - Shivaji Aadhalrao Patil Sarkarnama
पुणे

Amol Kolhe On Shivaji Aadhalrao Patil: चला पुरावे देतो, शब्द फिरवायचा नाही, कोल्हेंनी स्वीकारले आढळरावांचे आव्हान !

Shirur Lok Sabha Constituency : संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतंय, असं म्हणत कोल्हे यांनी आढळरावांवर टीकास्त्र सोडले होते.

Chaitanya Machale

Shirur News : शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंगतदार होत असल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्याआधीपासून या मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही लोक मतदारांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी नव्हे तर स्वत:च्या स्वार्थासाठी संसदेत गेले, असा आरोप कोल्हे यांनी केला होता.

खासदार कोल्हे यांनी केलेल्या आरोपामुळे चिडलेल्या माजी खासदार आढळराव पाटील यांनी त्यांना उत्तर देत पुरावे द्या, माघार घेतो असे सांगितले होते. त्यावर आता खासदार कोल्हे यांनी आढळरावांना ललकारले आहे. ओतूर येथे झालेल्या जाहीर सभेत जे बोललो त्याचं पुराव्यानिशी उत्तर देतो, मग शब्द फिरवायचा नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शिरुरचे (Shirur) उमेदवार खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे आव्हान स्वीकारलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतंय, असं म्हणत कोल्हे यांनी आढळरावांवर टीकास्त्र सोडले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे देखील या सभेला उपस्थित होते.

कोल्हे यांनी केलेल्या आरोपांवर आढळराव जाम भडकल्याचे दिसले. त्यांनी नाव घेत कोल्हेंवर तोफ डागली.आपली कंपनी ही सॉफ्टवेअरची नाही,तर हार्डवेअऱची असल्याचे स्पष्ट केले.तसेच तिच्याशी सबंधित एक,जरी प्रश्न मी विचारल्याचा पुरावा असेल,तर मी शर्यतीतून बाजूला होतो, नाहीतर, कोल्हेंनी माफी मागत उमेदवारी मागे घ्यावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले होते.

आढळराव पाटील यांनी दिलेलं आव्हान आपण स्वीकारत असल्याचे कोल्हे यांनी म्हटलं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ कोल्हे यांनी सोशल मिडीयावर टाकला आहे. चला पुरावे देतो, पण शब्द फिरवायचा नाही असं खासदार कोल्हे यांनी आढळरावांना म्हटलं आहे. यावर आता आढळराव काय भुमिका घेतात, याकडे आता महाविकास आघाडी तसेच महायुतीत सहभागी असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT