Pune, 2 May : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दत्तात्रेय भरणे आणि माझं ठरलंय की, इंदापूरला शेतीसाठी पाणी द्यायचे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा शब्द दिला आहे. त्यामुळे आम्ही बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, हवेली या भागाला शेतीसाठी पाणी देणार आहोत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. या सभेला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे (MLA Dattatraya Bharane), आमदार यशवंत माने, प्रवीण माने, अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील, सरपंच प्रवीण डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार म्हणाले, काही लोक येऊन डोळ्यातून पाणी काढून तुम्हाला भावनिक करतील. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तुमच्या शेतीला पाणी येणार नाही. त्यासाठी अंगात पाणी असणारा माणूस लागतो. आमच्या अंगात पाणी आहे, त्यामुळे उर्वरीत तालुक्यातील सर्वत्र पाणी आणण्याचे काम आम्ही करणार आहेात.
इंदापूर तालुक्यातील शेतीचा बारमाही पाणीप्रश्न सोडविण्याचे १९७८ मध्ये ठरले होते. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री इंदापूरचा पाणी प्रश्न सुटणार म्हणून लोकांनी हत्तीवरून साखर वाटली आणि मिरवणूक काढली होती. मात्र, गेली 45 वर्षे झाली तरीही पाण्याचा प्रश्न कायम आहे. पण, आम्ही आता इंदापूरचा पाणीप्रश्न सोडविण्याचे ठरविले आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, खडकवासला धरण साखळीतील खडकसवाला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांचे पाणी प्यायला जादा आणि शेतीला कमी मिळतेय. पण मुळशीचं पाणी पुण्याला प्यायला द्यावं आणि शिल्लक पाणी शेतीला दिल्यास हा भाग समृद्ध होण्यासाठी मदत होईल.
बारामतीचा खासदार मोदींच्या विचाराचा असेल तर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत जाऊन येथील बारमाही पाण्याचा प्रश्न सोडण्यासठी प्रयत्न करण्यात येतील. भरणे म्हणाले, इंदापूरच्या शेतीच्या पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी अजित दादांच्या पाठीमागे सर्वांनी ताकद उभी केली पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.