State Excise Department News : मुंबईत विदेशी मद्याचा साठा जप्त; सव्वा नऊ लाखांच्या मुद्देमालप्रकरणी एकजण ताब्यात

Loksabha Code of conduct लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे.
State Excise Action in Mumbai
State Excise Action in Mumbaisarkarnama

Mumbai News : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सायन पूर्व येथील धीरज आयर्न अँड स्टील कंपनीवर छापा टाकून परदेशात निर्मित केलेल्या व गोव्यातून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. एकूण नऊ लाख 22 हजार 196 रूपयांचा हा मुद्देमाल असून या प्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.

गोव्यातून आयात करुन मुंबईत आणलेला विदेशी मद्याचा साठा मुंबई पोलिसांनी जप्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही विदेशी मद्याचा बाजार सुरु झाल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. या गुन्ह्यापोटी संतोष ऋषी घरबिडी (वय 42) या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.

या संशयितांविरोधात दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 165 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्ली आणि गोवा, महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्यांची मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केलेले आहेत.

State Excise Action in Mumbai
Cash Seized in Kasaba and Chinchwad : निवडणुकीत खेळ पैशांचा! चिंचवडध्ये ४३ लाख तर कसब्यात ५ लाखांची रोकड जप्त

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे शहर अधीक्षक प्रविण कुमार तांबे, मुंबई शहर उपअधिक्षक सुधीर पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही कारवाई मुंबई शहर पथक क्रमांक 1 या पथकातील निरीक्षक कैलास तरे यांनी केली असून दुय्यम निरीक्षक रवींद्र जाधव, दुय्यम निरीक्षक रोहित आदलिंगे तसेच जवान विक्रम कुंभार, नरेश वडमारे यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. तरे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

Edited By : Umesh Bambare

State Excise Action in Mumbai
Delhi excise policy case : केजरीवालांना कधी आणि कुठे अटक होणार?, आपच्या नेत्याच्या मोठा दावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com