Amol Kolhe- Mahayuti News  Sarkarnama
पुणे

MP Amol Kolhe News : ...अन् खासदार कोल्हेंनी माईकाचा ताबा घेतला!

Shirur Lok Sabha Constituency : समोरच्यांनी पातळी सोडली तरी आपण आपला राजकारणाचा स्तर सोडायचा नाही, डॉ. कोल्हे यांचे आवाहन...

Chaitanya Machale

Bhosari News : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहाेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे. मतदारसंघात येणाऱ्या मोठ्या सोसायट्या, गार्डन, यापासून थेट लग्न समारंभ यांना उपस्थिती लावत उमेदवार आपला प्रचार करत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

निवडणुकीचा प्रचार करताना विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर टीका केली तरी आपला प्रचार करताना त्याच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टीका करायची नाही. तसेच जर कोणी आपल्या समोरच विरोधी पक्षाच्या नेत्यावर कडक भाषेत बोलत असेल, तर त्याला थांबवून त्याला शांत करायचे, हे राजकारणात खूप कमी वेळा पाहायला मिळते.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारात त्यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय उपस्थितांना आल्याचे पाहायला मिळाले. भोसरी विधानसभा मतदारसंघात कोल्हे प्रचार करताना एक ज्येष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे- पाटील (Dilip Walse Patil) यांच्याविषयी कडक भाषेत खदखद व्यक्त करत असल्याचे लक्षात येताच प्रचारासाठी आलेल्या खासदार कोल्हे यांनी प्रसंगावधान दाखवित त्यांच्याकडील माईक काढून घेत त्यांची समजूत काढली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार डॉ. अमोल कोल्हे भोसरी (Bhosari) विधानसभेतील इंद्रायणीनगर भागात गाव भेट दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी निओ रिगल सोसायटीतील मतदारांची भेट घेतली. नागरिकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. खासदार कोल्हे यांच्या स्वागतानंतर सोसायटीतील रहिवासी आपलं मनोगत मांडत होते. त्याच वेळी एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

ही खदखद व्यक्त करत असताना या ज्येष्ठ नागरिकाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याबद्दलची नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त करायला सुरुवात केली. त्यांच्या भाषेतील कडवटपणा लक्षात येताच, डॉ. कोल्हे यांनी तत्काळ त्यांना थांबवलं आणि त्यांच्या हातातील माईक आपल्या हातात घेत त्यांच्याशी सुसंवाद साधला.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून गेलेल्यांमुळे सर्वांनाच मनस्ताप झाला, हे खरं असलं तरी टीका करताना आपण राजकीय आपली राजकीय सभ्यता सोडायची नाही, असं आवाहन कोल्हे यांनी केलं. समोरून राजकारणाचा स्तर घसरला असला तरी आपण आपला स्तर कधीही घसरू द्यायचा नाही, असंही कोल्हे म्हणाले. यापूर्वीदेखील शिवनेरी किल्ल्यावर डॉ. कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांची भेट झाली असता, डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या वयाचा मान राखत त्यांच्या पाया पडून नमस्कार केला होता.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT