Supriya Sule News : अचानक दौरा सोडून सुप्रियाताई नाराज शिवसैनिकांच्या भेटीला, नेमकं काय घडलं?

Baramati Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटातील शिवसैनिक नाराज झाले होते. त्यानंतर याची माहिती सचिन अहिर यांनी याची माहिती सुप्रिया ताईंना दिली.
spriya sule
spriya sulesarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून एकत्रित रित्या सामोरे जाणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्र आहेत. तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे एकत्रित आहेत. प्रचाराचा दुसरा, तिसरा टप्पा सुरू असताना नाराजीनाट्य थांबताना पाहायला मिळत नाही. खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी केलेला भाषणामधील एका वक्तव्यामुळे भोरमधील ठाकरे गटातील शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी चक्क सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी दौरा अर्धवट सोडून नसरापूरमध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्याला उपस्थिती लावावी लागली. असे असले तरी नाराजी पूर्णपणे दूर झाली नसल्याचं बोललं जात आहे.

सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांचा शुक्रवारी ( 12 एप्रिल ) भोर तालुक्यात गावभेट दौरा झाला. या दौऱ्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी भोर मतदारसंघातील पुढील विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार हे संग्राम थोपटेच ( Sangram Thopate ) असतील. थोपटे आणि त्यांचे पदाधिकारी सहकार्य करतात. त्यांच्यापेक्षा दहा टक्के मेहनत विधानसभेला आम्ही करू. महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय आम्ही स्तब्ध बसणार नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. या वक्तव्यामुळे भोर विधानसभेत महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील दोन्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवार संग्राम थोपटे आणि शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांच्यात झाल्या आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये कुलदीप कोंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या ते ठाकरेंच्या सेनेत असून, पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळेंनी थेट संग्राम थोपटे हेच महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार असतील, असं सांगितल्याने कुलदीप कोंडे आणि ठाकरे गटातील इतर पदाधिकारी नाराज झाले आहेत.

याबाबत उघड-उघड नाराजी व्यक्त करताना कुलदीप कोंडे म्हणाले, "प्रचार चालू झाल्यापासून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पहिल्यापासून संग्राम थोपटेंना झुकतं माप दिलेलं आहे. या सगळ्यांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावललं जातंय. याच्या तक्रारी आम्ही वारंवार पक्षश्रेष्ठींकडे केल्या आहेत. हे निवडणुकीचं वारं आहे. त्यामुळे उमेदवाराला जास्त त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय. मात्र, उमेदवाराने सध्या फक्त लोकसभेबाबत बोलावं. विधानसभेच्या वेळेस जो निर्णय घ्यायचा, तो पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील."

spriya sule
Ajit Pawar Vs Supriya Sule : 'मी केलेल्या कामांचे फोटो खासदारांच्या कार्य अहवालात' ; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा!

सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रचारात सहभागी होणं टाळलं होतं. या पार्श्वभूमीवर रविवारी ( 15 एप्रिल ) सायंकाळी ठाकरे गटाचा मेळावा नसरापूर येथे पार पडला. या मेळाव्याला संपर्कप्रमुख सचिन अहिर ( Sachin Ahir ) उपस्थित होते. त्यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याने सुप्रिया सुळेंना याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी पुणे बावधन येथील दौरा अर्धवट सोडत या मेळाव्याला भेट दिली आणि नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झालाय का नाही हे पुढील काळात पाहावं लागेल.

( Edited By : Akshay Sabale )

R

spriya sule
Supriya Sule Vs Ajit Pawar : 'काय चुकलं तिचं? भाऊ फितूर झाला; स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com