Shrirang Barne Sarkarnama
पुणे

पिंपरी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची चर्चा थेट संसदेत..

स्मार्ट सिटीची (smart city) कमिटी आणि ठेकेदार मिलीभगत करुन काम करत आहेत, असा आरोप शिवसेना (Shivsena) खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेचे काम देशातील शंभर शहरांमध्ये सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) या कामातील निविदेत अनियमितता करून महापालिकेतील सत्ताधारी भाजपने (BJP) कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप यापूर्वीच शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसने (Congress) केला आहे. त्याबाबत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे तक्रारीही देण्यात आल्या आहेत. आता तो संसदेतही बुधवारी (ता.९ फेब्रुवारी) पोचला. पिंपरीतील स्मार्ट सिटीचे (smart city) काम अयोग्य पद्धतीने सुरु असून त्यातील अनियमततेची चौकशी करण्याची मागणी खासदार बारणे (Shrirang Barne) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल (ता.9 फेब्रुवारी) केली.

स्मार्ट सिटीची कमिटी आणि ठेकेदार मिलीभगत करुन पिंपरीत काम करत आहेत, असे सांगणाऱ्या खासदार बारणेंचा रोख हा पालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दिशेने होता. पूर्वीच विकसित असलेल्या भागात स्मार्ट सिटीचे काम चालू आहे, असे सांगत त्यांनी आपले कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनाही त्यांचे नाव न घेता लक्ष्य केले. कारण त्यांच्याच मतदारसंघात म्हणजे ते राहत असलेल्या पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या शहराच्या आलिशान व अगोदरच स्मार्ट आणि आय़टीएन्स राहत असलेल्या भागात एक हजार कोटी रुपयांची कामे सुरु आहेत.

स्मार्ट सिटीच्या कामात पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत आहे. स्मार्ट सिटीची कमिटी आणि ठेकेदार मिलीभगत करुन काम करत आहेत. काम दिलेल्या ठेकेदार कंपन्या ते करीत नसून त्यासाठी त्यांनी उपठेकेदार नेमले आहेत. ते हे काम अयोग्य पद्धतीने करीत आहेत. त्यामुळे शहरातील स्मार्ट सिटीच्या कामातील या अनियमिततेची निपक्षपातीपणे चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बारणेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी तातडीने शहरविकास मंत्र्यांना नोंद घेण्याचे आदेश दिले.

लोकसभेत बारणे म्हणाले की, स्मार्ट सिटीचे काम माझ्या मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमध्येही चालू आहे. ते टेक महिंद्रा, एल अॅण्ड टी, बी.जी.शिर्के आणि बेनेट कोलमेन या कंपन्या करत असल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. प्रत्यक्षात त्या ते करतच नाहीत. त्यांनी ते सब ठेकेदाराला दिले आहे. सब ठेकेदार व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे दर्जा राहत नाही. पूर्वीच विकसित असलेल्या भागात स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. स्मार्ट सिटीची कमिटी आणि ठेकेदार मिलीभगत करुन काम करत आहेत. विकास कामे केवळ कागदावर दिसत आहे. प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT