Shrirang Barne Sarkarnama
पुणे

Shrirang Barne : मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! श्रीरंग बारणेंना पीठासीन अधिकाऱ्याचा मान...

Maval Loksabah Constituency : बारणे सलग सात वेळा संसदरत्न; आता लोकसभा अध्यक्षांच्या तालिकेत समावेश

उत्तम कुटे

Loksabha Winter session 2023 : लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मावळचे शिवसेना (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांना मिळणार आहे. त्यांची लोकसभा अध्यक्षांच्या तालिका पॅनेलवर शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांनी सभागृहात त्यांच्या नावाची घोषणा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात करताच सभागृहात सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.

सभागृहात अध्यक्ष उपस्थित नसल्यास उपाध्यक्ष कामकाज पाहतात. परंतु, लोकसभेत उपाध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या अनुपस्थितीत तालिका अध्यक्ष काम पाहतात. सभागृहातील कामातील अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर तालिका अध्यक्षांची निवड केली जाते. त्यात लोकसभा अध्यक्षांनी खासदार बारणेंची निवड झाली आहे. त्यांना आता पीठासीन अधिकाऱ्याचे काम करण्याची संधी मिळणार आहे.

बारणे (Shrirang Barne) हे सलग दोन टर्म खासदार आहेत. 2014 पासून ते मावळचे प्रतिनिधित्व करतात. सभागृहात त्यांची शंभर टक्के उपस्थिती असते. विविध चर्चांमध्ये सहभाग आणि प्रश्न विचारण्यात ते आघाडीवर असतात. या अधिवेशनातही त्यांनी पुणे-लोणावळादरम्यान कोरोना काळात बंद लोकल सुरू करण्याची मागणी केली. या कामगिरीमुळे त्यांना सलग सात वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर आता तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर बारणे म्हणाले, 'लोकसभेत अनेक महान नेत्यांनी योगदान दिले आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या या सभागृहाचे पीठासीन म्हणून कामकाज चालविण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. सभागृहाच्या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. मावळ (Maval)च्या जनतेमुळेच मला या पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मतदारांसह, तालिका अध्यक्षांच्या पॅनेलवर निवड केल्याबाबत लोकसभेच्या अध्यक्षांचे आणि शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो.'

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT